श्री शिवाजी मंदिर हे मुंबईतील सर्वात जुने आणि प्रसिद्ध नाट्यगृह. ३ मे १९६५ या दिवशी या नाट्यगृहाचा शुभारंभ झाला. दादर पश्चिमेला रेल्वे स्थानकापासून फक्त १० मिनिटांच्या अंतरावरील एन. सी. केळकर मार्गावर असलेल्या या नाट्यगृहात अनेक मराठी नाटकांचे शुभारंभाचे प्रयोग झाले आहेत. श्री शिवाजी नाट्य मंदिर आज दादरमधील ओळखीचे ठळक ठिकाण झाले आहे. नुकतेच या नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यात आले. याची अंतर्गत सजावट प्रेक्षकांना आकर्षित करते. तर आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेला रंगमंच आणि ध्वनिशास्त्रावर आधारित ध्वनियंत्रणा व्यावसायिक नाटकांसाठी सोयीची ठरली आहे.
To add your own show or event to this Shows Calendar, please email us at hello@rangabhoomi.com or WhatsApp us at 999-256-256-1.