मराठी रंगभूमीचे विस्तृत साम्राज्य जोपासणे ही सर्व रंगकर्मींची जबाबदारी आहे. या साम्राज्यात व्यवसायिक आणि प्रायोगिक नाटकांना प्राधान्य दिले असले तरी एकांकिका विश्व ही प्रथम पायरी असते. या विश्वात नाट्यकर्मींना संधी देण्यासाठी नवनवीन एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जातात. गेले २ वर्ष अशीच एक स्पर्धा लोकप्रिय होत आहे. चिंतामणी कलामंच आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘खासदार करंडक २०२३‘ तसेच ‘नवरस राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा २०२३‘. यंदाचे वर्ष खासदार करंडक चे तिसरे तर ‘नवरस’ चे दुसरे वर्ष आहे. यावर्षी स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार नसून लाईट-शो म्हणजेच अंतिम फेरी रंगीत प्रयोग होणार आहे.
चिंतामणी कलामंच २०१८ साली ‘प्रथमेश पिंगळे’ यांनी सूरू केले. प्रथमेश पिंगळे हे एक फिल्म एडिटर असून त्यांना नाटकांची प्रचंड आवड आहे. अनेक नाटयसंस्था एकांकिका स्पर्धांमार्फत कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध पारितोषिके देतात. असेच वैविध्य चिंतामणी कलामंच या संस्थेने जोपासले आहे. ३१/२ ते ४ फूट उंचीचे सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांना गौरविण्यात येते. चिंतामणी कलामंच यांनी यापूर्वी लघुपट म्हणजेच शॉर्ट फिल्म फेस्टीवल चे आयोजन केले आहे. तसेच नाटकांची आवड असणाऱ्या पण रंगमंच उपलब्ध नसणाऱ्या कलाकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
खासदार करंडक नियमावली
- खासदार करंडक महासंग्राम २०२३ मध्ये सादर होणारी एकांकिका कोणत्याही स्पर्धेतील विजेती एकांकिका अथवा अंतिम फेरीत सादर झालेली असावी.
- प्रथम येणाऱ्या १० संघाना प्राधान्य दिले जाईल. एकांकिका निवडण्याचा अधिकार आयोजकांकडे राहील.
- अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या संघांनी त्यांच्याकडून मागविलेला सर्व तपशील भरून द्यावा.
- अंतिम फेरीमध्ये बॅक स्टेजला कलाकार तंत्रज्ञ याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
- अंतिम फेरी दिनांक १० जानेवारी २०१३ रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे सकाळी ०९.०० वाजल्यापासून संपन्न होईल.
- सादर होणारी एकांकिका मराठी भाषेत असावी व संहिता परिनिरीक्षण मंडळातर्फे प्रमाणित केलेली असावी.
- स्पर्धा खुली असून या स्पर्धेत कोणतेही महाविद्यालय, हौशी, प्रायोगिक व व्यवसायिक नाट्यसंस्था सहभागी होऊ शकते. स्पर्धा शुल्क १००१/- रु. फक्त असून एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत दिले जाणार नाही.
- स्पर्धा प्रवेश नोंदणी ०३ जानेवारी २०२३ पर्यंत असून, ०७ जानेवारी २०२३ अंतिम फेरीचे स्लॉट कळविण्यात येतील.
- अंतिम फेटीसाठी स्लॉट काढते वेळी संघातील प्रतिनिधीनी हजर असणे बंधनकारक आहे. तसेच स्लॉट अदलाबदल करायचे असल्यास संघांनी आपापसात चर्चा करावी.
- अंतिम फेरीच्या ३ दिवस आधी संपूर्ण श्रेयनामावली व संहिता यांच्या प्रत्येकी ३ प्रती सोबत लेखकाचे परवानगी पत्र देणे आवश्यक आहे. तसेच प्रकाश योजनेचा तपशील व नेपथ्याचा आराखडा देणे बंधनकारक राहील.
- लेखक एकापेक्षा अधिक एकांकिकांमध्ये सहभागी होऊ शकतात मात्र हि मुभा कलावंतांना नाही. नेमून दिलेल्या वेळेपेक्षा उशीर झाल्यास संघाला बाद ठरवले जाईल.
- वेशभूषा आणि रंगभूषेची व्यवस्था अंतिम फेरीतील स्पर्धकांनी स्वतः करायची आहे.
- स्पर्धक संस्थांनी सादरीकरणाच्या वेळेच्या एक तास आधी हजार रहावे.
- स्पर्धेच्या नियमावलीमध्ये प्रसंगानुसार आवश्यक व योग्य ते फेरफार करण्याचा अधिकार चिंतामणी कलामंच संस्थेची समिती स्वतःकडे राखून ठेवीत असून वरील सर्व नियम व आवश्यकता बदलांचे बंधन स्पर्धक संस्थांवर राहील. परिक्षकांचा निर्णय अंतिम निर्णय मानण्यात येईल.
खासदार करंडक — पारितोषिके
- प्रथम पारितोषिक: ₹२५,०००/- करंडक आणि सन्मानपत्र
- द्वितीय पारितोषिक : ₹१५,०००/- करंडक आणि सन्मानपत्र
- ७ वैयक्तिक पारितोषिके
नवरस एकपात्री अभिनय स्पर्धा
- स्पर्धा रवींद्र नाटय मंदिर, प्रभादेवी येथे आयोजिले आहे.
- स्पर्धा १५ वर्षावरील खुल्या गटात घेतली जाईल.
- स्पर्धकांना सादरीकरणासाठी ५ ते ७ मिनिटे दिली जातील.
- स्पर्धकांनी वेळेचे बंधन कटाक्षाने पाळावे.
- रंगमंचावर सादरीकरणासाठी स्पर्धकांना एक टेबल दोन खुर्च्या पुरवल्या जातील.
- वेशभूषा, पार्श्वसंगीताची आवश्यकता नाही.
- स्पर्धा संपल्यानंतर निर्णय जाहीर करण्यात येईल.
- स्पर्धेसाठी प्रवेश मुल्य रु. १०००/- रोख जमा करणे आवश्यक आहे.
- स्पर्धेसाठी कोणत्याही मराठी नाटक / एकांकिकेच्या अथवा सादरीकरण चालेल.
- परिक्षकांचे निर्णय अंतिम असतील आणि स्पर्धेबाबतचे सर्व अधिकार आयोजकांकडे असतील.
- स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख २३ जानेवारी २०२३ असेल. प्रथम ७५ स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येईल.
नवरस एकपात्री अभिनय स्पर्धा — पारितोषिके:
प्रथम क्रमांक : रू. १०,००१/- आणि सन्मानचिन्ह
व्दितीय क्रमांक : रू. ७,००१/- आणि सन्मानचिन्ह
स्पर्धेत भाग घेण्यासाठी पुढील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.
७७०००९६१९७/ ७२०८८०१५१०/ ८६५२४४९८०७
सर्व स्पर्धकांना तसेच आयोजकांना रंगभूमी.com कडून पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.