आपल्या देशात अलिकडच्या काळातील वाढत्या स्त्री अन्याय-अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या आविष्कार ५३ वा वर्धापनदिन आणि ३७ वा अरविंद देशपांडे स्मृती महोत्सवात स्त्री कलाकारांचे एकपात्री प्रयोग सादर होणार आहेत. स्त्री आणि समाज या अनुशंगाने विविध विषयांकडे पाहण्याचा स्त्रियांचा दृष्टीकोन हे या महोत्सवाचं वैशिष्ट्य असणार आहे. शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४ ला या महोत्सवाचे शुभारंभ होणार असून, दररोज सायंकाळी ७ वाजता प्रयोग होणार आहेत व मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४ ला या महोत्सवाची सांगता होणार आहे. गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट, आरे रोड, येथे हा महोत्सव पार पडणार आहे.
महोत्सवाची कार्यक्रमपत्रिका खालीलप्रमाणे
शुक्रवार, ९ फेब्रुवारी
‘अंजोर’ निर्मित
शुभारंभाचा प्रयोग
व्हय, I am Savitribai Phule (इंग्रजी)
लेखन आणि दिग्दर्शन : सुषमा देशपांडे
कलाकार : नंदिता पाटकर
शनिवार, १० फेब्रुवारी
‘हिमशिखा’, कोल्हापूर निर्मित
स्टोअर रुमचं काय झालं ?
लेखक : हिमांशू स्मार्त
दिग्दर्शन आणि भूमिका : ऋचिका खोत
‘नाटक दहा बाय वीस’, पुणे निर्मित
द रेप
मूळ लेखन : फ्रँका रामे
दिग्दर्शन : महेश खंदारे
कलाकार : धनश्री साठे
रविवार, ११ फेब्रुवारी
‘Being Association’ मुंबई निर्मित
स्टैंड अप विथ ‘डी’ गर्ल्स (हिंदी)
लेखन, कलाकार : रसिका आगाशे
सोमवार, १२ फेब्रुवारी
‘Unheardelephants’ मुंबई निर्मित
बाप रे
मूळ लेखन : ब्रिंदा शंकर
अनुवाद, कलाकार : वैष्णवी आर. पी.
‘नाटक दहा बाय वीस’, पुणे निर्मित
शक्तीमानने स्कर्ट का घातलाय?
लेखन : भाग्यश्री, तेजस
दिग्दर्शन : तेजस
कलाकार : भाग्यश्री
मंगळवार, १३ फेब्रुवारी*
‘आविष्कार’ निर्मित
शुभारंभाचा प्रयोग
सांगत्ये ऐका
लेखन : हंसा वाडकर
नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन : विश्वास सोहोनी
कलाकार : मानसी कुलकर्णी
या महोत्सवाची देणगी प्रवेशिका Rs. 200 असून ती महोत्सवादरम्यान रोज सायं. ५.०० वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे.
दर्जेदार नाटकं बघण्याची ही सुवर्णसंधी प्रेक्षकांनी दवडू नये आणि मोठया संख्येत उपस्थित राहून या नाट्यमहोत्सवाचा लाभ घ्यावा.