vanva minimal cover

INComplete Theatre & रंगभूमी.com निर्मित

VANVA

Marathi Natak • Online Ticket Booking

मूळ लेखक: दि. बा. मोकाशी
नाट्यरुपांतरण-दिग्दर्शन: शिवम पंचभाई

vanva minimal cover
Choose a Show Below

वणवा ही दि. बा. मोकाशी यांच्या वणवा या कथासंग्रहातली एक गोष्ट आहे. या कथेचं मुख्य पात्र आहे सरस्वती, सरस्वती ही कातकरी आदिवासी समाजातली एक साधी सरळ मुलगी आहे. तिचं नुकतंच लग्न झालेलं आहे. एक रात्री जंगलात लागलेल्या वणव्याची कहाणी आहे. वणवा लागण्यापूर्वीची शांतता, वणवा पेटल्यानंतर जंगलात जनावरांची-माणसांची होणारी धावपळ आणि वणवा विझल्यानंतर जाळून राख झालेल्या जंगलासोबत मनात घर करून बसणारी शांतता! असा एकूण गोष्टीचा आलेख आहे.

एका शांततेकडून दुसऱ्या शांततेपर्यंतचा प्रवास गोष्टीत मांडलेला आहे. कातकरी आदिवासी समाज जो पूर्णपणे जंगलावर अवलंबून असतो त्यांच्या नजरेतून गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचते. पर्यावरणाचा होत जाणारा ऱ्हास यावर सुद्धा गोष्टीत भाष्य केलं आहे.

दि. बा. मोकाशी यांच्या कथेवर आधारित ‘वणवा’ या सव्वा तासाच्या नाट्यदीर्घांकाचे  नाट्यरूपांतरण आणि दिग्दर्शन शिवम पंचभाईने केले आहे.

Based on a story by D.B. Mokashi, adapted and directed by Shivam Panchbhai.

Performers: Samruddhi Khadke, Rashmi Mali, Pradnya Samarth
Lights: Yash Potnis
Costumes: Deepali Deshmukh
Music: Parth Ghaskadbi, Indraneel Hirve

संगीत संयोजन: चैतन्य बीडकर, शुभंकर भागवत
निर्मिती व्यवस्थापक: अनघा कुलकर्णी, कौशिक कुलकर्णी
Publicity Design: शुभम कुलकर्णी

निर्माते: गायत्री देवरुखकर, प्रेषित देवरूखकर, शिवम पंचभाई