सोशल मंच आणि टायनी टेल्स थिएटर कंपनी प्रस्तुत
तुजी औकात काये
Marathi Natak • Online Ticket Booking
लेखक: वेदिका कुमारस्वामी
दिग्दर्शक: प्रतिक्षा खासनिस, निकिता ठुबे
Choose a Show Below
वेदिका कुमारस्वामी लिखित, ‘गावनवरी’ पुस्तकावर आधारित, ‘तुजी औकात काये’ या नाटकाची कथा आहे देवदासींच्या वंशात जन्मलेल्या वेदिकाची, तिच्या प्रवासाची.
लहानपणापासूनच देवदासींचं परंपरागत जगणं तिच्याही वाट्याला येतं.
पण, ती तिच्या नशिबातून सुटून, तिचं घर सोडते. जगण्याच्या आणि आत्म-शोधाच्या प्रवासाला निघते. तिचा हा प्रवास म्हणजे जाचकतेच्या ठिकाणाहून अनिश्चित स्वातंत्र्याकडे जाण्याचा प्रवास आहे.
या प्रवासात ती ज्याच्यासोबत लग्न झालं त्या देवाला घटस्फोट देण्याचे धाडस करते आणि तिच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा भाग मागे सोडते. ती तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. विविध शक्तिपीठातल्या पवित्र देवस्थळी जाऊन त्यां देवींच्या कथांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते आणि विद्रोहाच्या ठिणगीसह तिचे नशीब आणि सशक्तीकरण शोधते.
तिची ही कथा, आत्म-शोधाचा मार्ग, नाटकात केवळ शब्दातून न मांडता, गाणी आणि कवितेच्या संगीतमय प्रवासात रंगवली जाते.
Writer: Vedika Kumarwasmi
Dramaturgy and Direction: Pratiksha Khasnis and Nikita Thube
Music Director: Deep Dabare and Swapnil Bhave
Costumes: Sharayu Tayade
Light designing: Omkar Hajare
Set: Pratik Panchafula
Produced by: Social Manch
Producer: Mayur Deshmukh
Production Manager: Abhinav Jeurkar
Production Associate: Kalpesh Samel
Posters and creative support: Kaustubh Hingane
Performers: Kalpesh Samel, Nikita Thube, Pratiksha Khasnis, Deep Dabare, Swapnil Bhave