शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान सादर करीत आहोत
आय. एम. पुंगळ्या शारूक्या आगीमहुळ
Marathi Natak • Online Ticket Booking
लेखक-दिग्दर्शक: प्रशांत निगडे
Choose a Show Below
*’आय. एम. पुंगळ्या शारूक्या आगीमहुळ’* हे नाटक म्हणजे मोकळ्या माळरानावर संसार थाटलेल्या जोडप्याची कथा आहे. फासेपारधी समाजातील ‘पुंगळ्या’ आणि त्याची बायको ‘मतलबी’ यांच्यातील अतूट प्रेम, त्यांनी केलेला संघर्ष, बंड आणि माणुसकीचे दर्शन या नाटकातून होते. अस्तित्वाची लढाई म्हणजे हे नाटक. फासे पारधी समाजाला इंग्रजांनी चोर, दरोडेखोर हा दिलेला शिक्का अजून त्यांच्या माथी कायम आहे. या वस्तीत ‘माणूस’ राहतो हे अजून ही इतर समाज स्वीकारायला तयार नाही.
कथेतील नायकाच्या अस्तित्वाचा एक ही लेखी पुरावा नाही. त्यामुळे त्याच्या हाताला काम नाही. स्वतःची ओळख दर्शविणारे एक ही कागदपत्र न बनवू शकलेल्या पुंगळ्याच्या फास्यात एक पक्षी अडकतो. हा पक्षी यापूर्वी कधीही कोणाच्या पाहण्यात आलेला नाही. त्या पक्षाची नोंद करण्यासाठी आलेल्या पक्षी निरीक्षकाला पाहून आपण किती कमनशिबी आणि निरुपयोगी आहोत हे नायकाच्या लक्षात येते. अस्तित्व हरवून बसलेल्या आणि त्यासाठी प्रचंड मोठा लढा देणाऱ्या प्रत्येक योध्याची ही गोष्ट आहे.
कलाकार: प्रशांत निगडे, विरीशा नाईक, श्रध्दा शितोळे
वेशभूषा: विरीशा नाईक, श्रद्धा शितोळे
रंगभूषा: निलम चव्हाण
प्रकाश योजना: सुनील मेस्त्री
नेपथ्य निर्माण: संतोष कदम
नेपथ्य सहाय्यक: मनीष सावंत
व्यवस्थापन: सुजित भोये
पार्श्व संगीत: कृष्णा- देवा
ध्वनी संयोजक: अजय, ऋत्विक मनचेकर
ध्वनी सहाय्यक: निखिल आवटे
आवाज: दिनेश जोशी, संजीव धुरी, सुजित भोये
रंगमंच सहाय्यक: प्रेम कन्होजिया, निधी जाधव, ओमकार तेली, आर्या विनोद मिरजणकर, प्रियांका मौर्या, समाधान वाघमारे, प्रथमेश पाटील, वेदिका, प्रज्योत देवळे, तन्मयी कांबळे, ओमकार जाधव, प्रतीक साठे, अमेय देशमुख.