‘उन्मुक्त कलाविष्कार’च्या सहकार्याने, अस्तित्व संस्था, ठाणे सादर करीत आहे
अंधे जहाँ के अंधे रास्ते
Marathi Natak • Online Ticket Booking
लेखक-दिग्दर्शक: उर्मी
Choose a Show Below
हे नाटक एका सत्य घटनेवर आधारित आहे. या नाटकात मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांच्या घरात, परिवारात व वैवाहिक जीवनात काय अडचणी येतात याचं अगदी स्पष्ट चित्र आपल्यासमोर मांडलं आहे. त्यांना पुरेसा पगार मिळत नाही व जितके पैसे मिळतात ते कधीही वेळेवर मिळत नाहीत. एवढंच काय त्यांना पुरेशी आरोग्यसेवादेखील मिळत नाही. त्यांच्या जातीमुळे व त्यांच्या शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना आयुष्यभर या गरिबीत जगावं लागतं. किंबहुना त्यांना गरिबीत जगवलं जातं, कारण त्यांनी जर हे काम केलं नाही तर मुंबई घाणीने तुंबून जाईल. त्यामुळे त्यांच्या पिढ्यानपिढ्या हीच घाण उपसत आल्या आहेत. मॅनहोलमधून येणाऱ्या त्या असह्य वासाला वैतागून हे कर्मचारी नशेच्या आहारी जातात. मॅनहोलमध्ये उतरताना त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिली जात नाही. हे कंत्राटी कामगार असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुखसोयीदेखील त्यांना मिळत नाही. सरकार त्यांच्या या परिस्थितीची जबाबदारी कधी घेणार? अजून किती पिढ्या ही माणसं हेच काम करत राहणार? आणि त्यांच्या या समस्येचं निवारण आहे की नाही? असे बरेच प्रश्न विचारणारं हे नाटक आहे.
पुढील लिंकवर क्लिक करून नाटकाचा रिव्ह्यू नक्की वाचा!
अंधे जहाँ के अंधे रास्ते [Review] — शहराच्या घाणीत अडकलेल्या मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांची कथा