विकास चव्हाण २०१० पासून नाट्यक्षेत्रात काम करत आहे. कॉलेजमध्ये असताना बऱ्याच एकांकिकांमधून काम केले. पुढे जाऊन बऱ्याच व्यावसायिक नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळत गेली. ‘निम्मा शिम्मा राक्षस‘ हे सध्या रंगभूमीवर जोरदार चालू असलेलं नाटक, तसेच पुरस्कार विजेत्या ‘मर्डरवाले कुलकर्णी‘ या नाटकात हवालदार मानमोडे हे पात्र साकारत आहे. काही मालिका आणि चित्रपटांचाही भाग आहे.