वंदना गुप्ते यारंगभूमीवरील दिग्गज अभिनेत्री असून त्यांनी आजवर मराठी रंगभूमीला अनेक अजरामर नाट्यकृती दिल्या आहेत. आज वयाच्या ७२ व्या वर्षीही त्या जिगीषा निर्मित ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ या नाटकात अभिनय करत आहेत. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका माणिक वर्मा आणि श्री अमर वर्मा यांच्या त्या कन्या आहेत. तसेच, भारती आचरेकर आणि राणी वर्मा या त्यांच्या बहिणी आहेत. वाडा चिरेबंदी, चारचौघी, अखेरचा सवाल, सुंदर मी होणार या आणि अशा त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारलेल्या कित्येक नाटकांनी रंगभूमी समृद्ध केली आहे.