अजिंक्य भोसले यांचे मास्टर्स इन पेरफॉरमिंग आर्ट्स पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून पूर्ण झाले आहे. गेल्या १५ वर्षांपासून ते मराठी रंगभूमीवर अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. ह्या कालावधीत त्यांनी विजय केंकरे दिग्दर्शित “अ परफेक्ट मर्डर” आणि “यू मस्ट डाय” या व्यावसायिक नाटकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच, त्यांनी अनेक प्रायोगिक मराठी आणि हिंदी नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. सध्या अजिंक्य प्रशांत दामले यांच्या थिएटर स्कूलमध्ये नाट्यप्रशिक्षक म्हणून काम करत आहेत.