अभिजीत झुंजारराव गेली पंचवीस वर्षे सातत्याने व्यावसायिक, प्रायोगिक व समांतर रंगभूमीवर कार्यरत आहेत. उत्तम अभिनेते तर आहेतच. पण तितकेच उत्कृष्ट दिग्दर्शकही आहेत. त्यांनी सादर केलेली प्रत्येक नाट्यकृती ही नव्या धाटणीची असते. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन देऊन प्रेक्षकांना चकित करण्यात या नाट्यकर्मीची हातोटी आहे. लेझीम खेळणारी पोरं, घटोत्कच, माकड ही त्यांची काही नावाजलेली नाटकं. सद्ध्या त्यांचं चं. प्र. देशपांडे लिखित ‘मन’ हे नाटक प्रेक्षकांचं मन जिंकतंय.