आधी वाचा →
- वाड्यात जोडलेली माणसे – लेखकाचे मनोगत
- वाड्यात जोडलेली माणसे – भाग १: …आणि ही ‘वहिनी’ मला माझी वाटू लागली!
- वाड्यात जोडलेली माणसे – भाग २: भावना पोहचत नसल्या तरी मनात प्रेम राहतेच ना!
आपण धरणगावकर देशपांडे यांच्या कुटुंबाची आपल्या घराशी तुलना केली तर आपल्याही घरात तशीच अनेक मंडळी वावरत आहेत, असे कळते. आपल्या कुटुंबात आपला एखादा दादा, आपले काका किंवा अगदी आपले बाबा खूप कर्तव्यदक्ष असतात. म्हणजे सण, समारंभ, अगदी दुखवटे इत्यादी गोष्टीत त्यांचे योगदान किंवा त्या कामात त्यांचा वाटा जरा जास्तच असतो. घरातील महत्त्वाच्या कार्याना त्यांच्या मेहनतीची जोड असल्याशिवाय ती कार्ये सफलसंपन्न होत नाहीत. देशपांडेच्या वाड्यातसुद्धा अशीच एक व्यक्ती आहे. तो म्हणजे त्यांचा थोरला मुलगा भास्कर. हा भास्कर म्हणजेच वहिनीचा नवरा, रंजू आणि परागचे वडील आणि घरातील वडील बंधू. एकंदर जेव्हा मी भास्करला ‘वाडा चिरेबंदी’ मध्ये पाहिले तेव्हा तो मला थोडा लोभी, संधीसाधू वगैरे वाटला. कारण आपले वडील तात्याजी यांच्या मृत्यू पश्चात होणाऱ्या कार्याचा खर्च धाकटा भाऊ सुधीर याच्याकडून अर्धा का होईना कश्या रीतीने करून घेता येईल, यासाठी त्याने केलेले प्रयत्न अनेकदा अधोरेखित झाले.
मग चंदूवर (म्हणजेच सर्वात धाकट्या भावावर) सर्व कष्टाच्या कामाचा बोजा टाकणे असो, किंवा परागला सतत झिडकारत वागवणे असो त्याच्या वागण्यात सुरुवातीला मला खूप अहंकार जाणवला. तात्याजी असताना आणि त्यांच्यानंतर सुद्धा मीच हा वाडा व वाड्याचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळतोय, हे सतत समोरच्याला जाणीव करून देणारा भास्कर पहिल्या भागाच्या पूर्वार्धापर्यंत मला तसाच वाटत राहिला. पण एकंदर वाड्याचा इतिहास आणि वर्तमानातील घडत असलेल्या घटनांचा जेव्हा मी ताळमेळ साधला तेव्हा लक्षात आले कि भास्कर वाईट नाहीये. किंबहुना वाड्यात कुणीच वाईट, दुष्ट नाहीये.
परिस्थितीमुळे त्यांना त्यांच्या स्वभावात बदल करावा लागला; जो प्रथमतः आपल्याला चुकीचा वाटत असला तरी वाड्याच्या इतिहासाशी त्याचा संबंध जोडल्यावर तो किती रास्त आहे, हे कळत जाते. आईचे अचानक उद्भवलेले आँपरेशन, तात्याजीच्या आजारपणाचा खर्च, शेतीवाडी, घरदार, जमीनजुमला इत्यादी सर्व हद्दींवर भास्कर एकटाच लढत होता. घरातील कर्ता म्हणून सर्व जबाबदारी त्याने स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. त्यावेळी अपेक्षित असे आर्थिक किंवा मानसिक पाठबळ त्याला सुधीरकडून मिळाले तर नाहीच किंवा साध्याभोळ्या चंदूकडून त्याला त्याची अपेक्षा करणेही जमले नाही. त्यामुळेच सर्व संकटाना तो खंबीरपणे बायकोच्या साथीने तोंड देऊ शकला.
सतत काबाडकष्ट केलेल्या आपल्या घरातील व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यात एक प्रकारे ‘अनुभवाचे बोल’ जाणवतात. त्यामुळे कधीकधी ती व्यक्ती आपल्याला अहंकारी, स्वाभिमानी वाटू शकते पण खरंतर ते त्या व्यक्तीने अनुभवलेले असते आणि त्यामुळेच त्या व्यक्तीला बोलण्याचा नैतिक हक्क प्राप्त होतो. तसेच काहीसे भास्करच्या बाबतीत जाणवले. सुधीरच्या अनुपस्थितीत त्याने ही सर्व परिस्थिती अनुभवलेली आहे; त्यामुळे आतातरी त्याची साथ मिळावी अशी त्याची माफक अपेक्षा असणे, मला तरी योग्यच वाटते. ती वेळ त्याने सांभाळून घेतली म्हणूनच वाड्याचा व्यवहार आजतागायत सुरळीतपणे चालू राहिला. सुधीरचे तात्याजी गेल्यावर पाच दिवसांनी वाड्यात येणे, त्यानंतर खर्चाच्या गोष्टींमधून हात झटकणे, घरातील विकलेल्या वस्तूंचा हिशोब विचारणे, हिश्श्यांच्या गोष्टी करणे यांसारख्या घटनांमुळे भास्करचा तिळपापड एक होणे स्वाभाविकच आहे. तो भले मानी मोठेपणा दाखवतोय पण त्याला तो हक्क त्याने वाड्यासाठी केलेल्या त्यागानेच मिळालेला आहे.
सुधीर एका प्रसंगात त्याला चार खडेबोल सुनावतो की तू जे काही केलेस ते तात्याजींचे पैसे वापरूनच. वास्तविक पाहता भास्करने पिढीजात संपत्तीच वापरली, काही प्रमाणात आगाउपणे निर्णयही घेतले पण तरीही त्याला सुधीरची साथ नव्हती, ही बाब विचारात घेण्याजोगी आहे. त्याच्या स्वभावाची एक दुसरी बाजू अनुभवायला मिळाली ती म्हणजे इतके होऊनही त्याला सुधीरच्या मुलाची म्हणजेच अभयची काळजी आहे. आपल्या परागमुळे अभय बिघडेल आणि त्यामुळेच सुधीरने परागला मुंबईला नेऊ नये, किंवा त्याचे एक वाक्य मला फार आवडले ते म्हणजे – ‘मरणाला नाही तर किमान तोरणाला तरी एकत्र यायला हवेच’. ह्यातूनच त्याच्यातील घराप्रती आणि घरातील माणसांप्रती असलेला आपलेपणा दिसून येतो. वाडा चिरेबंदी मध्ये सापडलेला थोडा आततायीपणा करणारा भास्कर मग्न तळ्याकाठी मध्ये मला किंचित नरमलेला वाटला. हा तसे पाहता आधी रंजुचे मास्तरसोबत पळून जाणे, परागचे कामधंदा न करता बेकारपणे घरात बसून राहणे, घरातील खर्चाचे गणित इत्यादी गोष्टींमुळे त्याच्या डोक्यात सतत विचारांचे चक्र चालूच होते. पण मग्न तळ्याकाठी मध्ये रंजू आणि परागचे एकाच मांडवात लग्न होणे, परागने घराची संपूर्ण आर्थिक जबाबदारी स्वीकारणे, वाड्याला थोडे चांगले दिवस येणे यामुळे भास्कर थोडा समाधानी झाला होता.
निवृत्त झाल्यासारखा त्याचा वावर होता. आता त्याला कुणी आपल्याला मदत करावी, अशी अपेक्षा राहिली नव्हती आणि म्हणूनच त्याच्या वागण्यात नरमाई आली होती. त्यामुळे सुधीरसोबतचे त्याचे नाते पुन्हा एकदा बंधुभावाचे व्हायला लागले होते. कारण आता एकामेकांकडून कोणत्याही अपेक्षा नव्हत्या. एरव्ही सुधीर मुंबईला निघताना त्याला न अडवणारा भास्कर मग्न तळ्याकाठी मध्ये मात्र सुधीरने रंजुच्या लग्नानंतर आणखी काही दिवस वाड्यात आपल्या सोबत राहावे, अशी इच्छा व्यक्त करतो. लहानपणानंतर बऱ्याच वर्षानी दोघे भाऊ एकत्र हनुमानाच्या मंदिरात जातात. एकूणच ‘काळ’ आणि ‘परिस्थिती’ हे भास्करच्या स्वभावाचे आणि वागणुकीचे मूल्यमापन करत असतात, हेच खरे. युगान्तमध्ये हा भास्कर भाऊ निवर्तलेला असतो.
तात्याजीनंतर घरातील जेष्ठ असलेला भास्कर समजणे काहीसा वेगळा अनुभव देऊन जाते. पण जेव्हा वाडा ते मग्नमधील संपूर्ण भास्कर आपण अनुभवतो तेव्हा त्याच्या स्वभावात परिस्थितीनुरूप होत गेलेला बदल आपल्याला सहज शोधून काढता येतो; त्याच्या व्यक्तिमत्त्वात आलेला स्वाभिमान नकळत अधोरेखित होतो आणि मग अहंकारी वाटणारा भास्कर आपलाच ‘भाऊ’ बनून जातो. अहंकारी भास्कर ते निवृत्त भास्कर असा प्रवास पाहिल्यावर त्याच्या स्वभावाची एक वेगळी बाजू समजून घेता येते. कारण पूर्वाश्रमीच्या काही संदर्भांनी भास्करच्या वागण्यात बदल झालेला असतो; जो वाडा ते मग्नच्या प्रवासात उलगडत जातो. त्यामुळे ज्याचा आधी राग येतो त्याच भास्करमध्ये नंतर आपल्याला आपला दादा, एखादा काका किंवा आपले स्वत:चे वडीलच दिसू लागतात. आणि हा भास्कर आपला वाटू लागतो !
आपण धरणगावकर देशपांडे यांच्या कुटुंबाची आपल्या घराशी तुलना केली तर आपल्याही घरात तशीच अनेक मंडळी वावरत आहेत, असे कळते. आपल्या कुटुंबात आपला एखादा दादा, आपले काका किंवा अगदी आपले बाबा खूप कर्तव्यदक्ष असतात. म्हणजे सण, समारंभ, अगदी दुखवटे इत्यादी गोष्टीत त्यांचे योगदान किंवा त्या कामात त्यांचा वाटा जरा जास्तच असतो. घरातील महत्त्वाच्या कार्याना त्यांच्या मेहनतीची जोड असल्याशिवाय ती कार्ये सफलसंपन्न होत नाहीत. देशपांडेच्या वाड्यातसुद्धा अशीच एक व्यक्ती आहे. तो म्हणजे त्यांचा थोरला मुलगा भास्कर. हा भास्कर म्हणजेच वहिनीचा नवरा, रंजू आणि परागचे वडील आणि घरातील वडील बंधू. एकंदर जेव्हा मी भास्करला ‘वाडा चिरेबंदी’ मध्ये पाहिले तेव्हा तो मला थोडा लोभी, संधीसाधू वगैरे वाटला. कारण आपले वडील तात्याजी यांच्या मृत्यू पश्चात होणाऱ्या कार्याचा खर्च धाकटा भाऊ सुधीर याच्याकडून अर्धा का होईना कश्या रीतीने करून घेता येईल, यासाठी त्याने केलेले प्रयत्न अनेकदा अधोरेखित झाले. मग चंदूवर (म्हणजेच सर्वात धाकट्या भावावर) सर्व कष्टाच्या कामाचा बोजा टाकणे असो, किंवा परागला सतत झिडकारत वागवणे असो त्याच्या वागण्यात सुरुवातीला मला खूप अहंकार जाणवला.
तात्याजी असताना आणि त्यांच्यानंतर सुद्धा मीच हा वाडा व वाड्याचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळतोय, हे सतत समोरच्याला जाणीव करून देणारा भास्कर पहिल्या भागाच्या पूर्वार्धापर्यंत मला तसाच वाटत राहिला. पण एकंदर वाड्याचा इतिहास आणि वर्तमानातील घडत असलेल्या घटनांचा जेव्हा मी ताळमेळ साधला तेव्हा लक्षात आले कि भास्कर वाईट नाहीये. किंबहुना वाड्यात कुणीच वाईट, दुष्ट नाहीये. परिस्थितीमुळे त्यांना त्यांच्या स्वभावात बदल करावा लागला; जो प्रथमतः आपल्याला चुकीचा वाटत असला तरी वाड्याच्या इतिहासाशी त्याचा संबंध जोडल्यावर तो किती रास्त आहे, हे कळत जाते. आईचे अचानक उद्भवलेले आँपरेशन, तात्याजीच्या आजारपणाचा खर्च, शेतीवाडी, घरदार, जमीनजुमला इत्यादी सर्व हद्दींवर भास्कर एकटाच लढत होता. घरातील कर्ता म्हणून सर्व जबाबदारी त्याने स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. त्यावेळी अपेक्षित असे आर्थिक किंवा मानसिक पाठबळ त्याला सुधीरकडून मिळाले तर नाहीच किंवा साध्याभोळ्या चंदूकडून त्याला त्याची अपेक्षा करणेही जमले नाही. त्यामुळेच सर्व संकटाना तो खंबीरपणे बायकोच्या साथीने तोंड देऊ शकला.
सतत काबाडकष्ट केलेल्या आपल्या घरातील व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यात एक प्रकारे ‘अनुभवाचे बोल’ जाणवतात. त्यामुळे कधीकधी ती व्यक्ती आपल्याला अहंकारी, स्वाभिमानी वाटू शकते पण खरंतर ते त्या व्यक्तीने अनुभवलेले असते आणि त्यामुळेच त्या व्यक्तीला बोलण्याचा नैतिक हक्क प्राप्त होतो. तसेच काहीसे भास्करच्या बाबतीत जाणवले. सुधीरच्या अनुपस्थितीत त्याने ही सर्व परिस्थिती अनुभवलेली आहे; त्यामुळे आतातरी त्याची साथ मिळावी अशी त्याची माफक अपेक्षा असणे, मला तरी योग्यच वाटते. ती वेळ त्याने सांभाळून घेतली म्हणूनच वाड्याचा व्यवहार आजतागायत सुरळीतपणे चालू राहिला. सुधीरचे तात्याजी गेल्यावर पाच दिवसांनी वाड्यात येणे, त्यानंतर खर्चाच्या गोष्टींमधून हात झटकणे, घरातील विकलेल्या वस्तूंचा हिशोब विचारणे, हिश्श्यांच्या गोष्टी करणे यांसारख्या घटनांमुळे भास्करचा तिळपापड एक होणे स्वाभाविकच आहे. तो भले मानी मोठेपणा दाखवतोय पण त्याला तो हक्क त्याने वाड्यासाठी केलेल्या त्यागानेच मिळालेला आहे. सुधीर एका प्रसंगात त्याला चार खडेबोल सुनावतो की तू जे काही केलेस ते तात्याजींचे पैसे वापरूनच. वास्तविक पाहता भास्करने पिढीजात संपत्तीच वापरली, काही प्रमाणात आगाउपणे निर्णयही घेतले पण तरीही त्याला सुधीरची साथ नव्हती, ही बाब विचारात घेण्याजोगी आहे.
त्याच्या स्वभावाची एक दुसरी बाजू अनुभवायला मिळाली ती म्हणजे इतके होऊनही त्याला सुधीरच्या मुलाची म्हणजेच अभयची काळजी आहे. आपल्या परागमुळे अभय बिघडेल आणि त्यामुळेच सुधीरने परागला मुंबईला नेऊ नये, किंवा त्याचे एक वाक्य मला फार आवडले ते म्हणजे – ‘मरणाला नाही तर किमान तोरणाला तरी एकत्र यायला हवेच’. ह्यातूनच त्याच्यातील घराप्रती आणि घरातील माणसांप्रती असलेला आपलेपणा दिसून येतो. वाडा चिरेबंदी मध्ये सापडलेला थोडा आततायीपणा करणारा भास्कर मग्न तळ्याकाठी मध्ये मला किंचित नरमलेला वाटला. हा तसे पाहता आधी रंजुचे मास्तरसोबत पळून जाणे, परागचे कामधंदा न करता बेकारपणे घरात बसून राहणे, घरातील खर्चाचे गणित इत्यादी गोष्टींमुळे त्याच्या डोक्यात सतत विचारांचे चक्र चालूच होते. पण मग्न तळ्याकाठी मध्ये रंजू आणि परागचे एकाच मांडवात लग्न होणे, परागने घराची संपूर्ण आर्थिक जबाबदारी स्वीकारणे, वाड्याला थोडे चांगले दिवस येणे यामुळे भास्कर थोडा समाधानी झाला होता. निवृत्त झाल्यासारखा त्याचा वावर होता. आता त्याला कुणी आपल्याला मदत करावी, अशी अपेक्षा राहिली नव्हती आणि म्हणूनच त्याच्या वागण्यात नरमाई आली होती. त्यामुळे सुधीरसोबतचे त्याचे नाते पुन्हा एकदा बंधुभावाचे व्हायला लागले होते. कारण आता एकामेकांकडून कोणत्याही अपेक्षा नव्हत्या. एरव्ही सुधीर मुंबईला निघताना त्याला न अडवणारा भास्कर मग्न तळ्याकाठी मध्ये मात्र सुधीरने रंजुच्या लग्नानंतर आणखी काही दिवस वाड्यात आपल्या सोबत राहावे, अशी इच्छा व्यक्त करतो. लहानपणानंतर बऱ्याच वर्षानी दोघे भाऊ एकत्र हनुमानाच्या मंदिरात जातात. एकूणच ‘काळ’ आणि ‘परिस्थिती’ हे भास्करच्या स्वभावाचे आणि वागणुकीचे मूल्यमापन करत असतात, हेच खरे. युगान्तमध्ये हा भास्कर भाऊ निवर्तलेला असतो.
तात्याजीनंतर घरातील जेष्ठ असलेला भास्कर समजणे काहीसा वेगळा अनुभव देऊन जाते. पण जेव्हा वाडा ते मग्नमधील संपूर्ण भास्कर आपण अनुभवतो तेव्हा त्याच्या स्वभावात परिस्थितीनुरूप होत गेलेला बदल आपल्याला सहज शोधून काढता येतो; त्याच्या व्यक्तिमत्त्वात आलेला स्वाभिमान नकळत अधोरेखित होतो आणि मग अहंकारी वाटणारा भास्कर आपलाच ‘भाऊ’ बनून जातो. अहंकारी भास्कर ते निवृत्त भास्कर असा प्रवास पाहिल्यावर त्याच्या स्वभावाची एक वेगळी बाजू समजून घेता येते. कारण पूर्वाश्रमीच्या काही संदर्भांनी भास्करच्या वागण्यात बदल झालेला असतो; जो वाडा ते मग्नच्या प्रवासात उलगडत जातो. त्यामुळे ज्याचा आधी राग येतो त्याच भास्करमध्ये नंतर आपल्याला आपला दादा, एखादा काका किंवा आपले स्वत:चे वडीलच दिसू लागतात. आणि हा भास्कर आपला वाटू लागतो !