आम्ही काही नाटकांसाठी Giveaway जाहीर करून प्रेक्षकांना नाटकांची मोफत तिकिटे जिंकण्याची संधी प्राप्त करून देत असतो. जर तुम्हाला अद्याप या कॉन्टेस्टबद्दल काहीच माहिती नसेल तर पुढील लेख नक्की वाचा.
‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे!’ नाटकाची तिकिटे जिंकण्याची सुवर्णसंधी [Free Tickets Giveaway]
या महिन्यात ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे‘ या नाटकासाठी बोरिवली, ठाणे व डोंबिवली अशा तीन ठिकाणी Giveaway कॉन्टेस्ट सुरू होता. तीनही ठिकाणांहून प्रेक्षकांकडून Giveaway ला उत्तम प्रतिसाद मिळाला. हा Giveaway आयोजित करण्यात आम्हाला ज्यांनी सहकार्य केले, असे वेद प्रोडक्शन हाऊसचे गोपाळ अलगेरी आणि विनय अलगेरी! या निर्मात्यांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो. Giveaway जिंकलेल्या विजेत्यांनी आमच्यापर्यंत नाटकाबद्दल प्रतिक्रिया पाठविल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे:
सिद्धी साटम (ठाणे)
काल ठाण्यातील प्रयोग पहिला… Covid 19 च्या मोठ्या गॅपनंतर पाहिलेलं हे पहिलंच नाटक… खूप दिवसांनी दर्जेदार आणि निखळ Comedy अनुभवली. प्रत्येक कलाकाराने पकडलेलं character चं बेअरिंग कमल आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्या चेहऱ्यावर हसू टिकून होतं. Thank you team #hichtarfamilychigammataahe for this wonderful laughter riot! BEST WISHES
विजयकुमार अणावकर (डोंबिवली)
फॅमिलीची गमतीदार एंटरटेनमेंट
अलीकडच्या काळात रंगभूमीला पुन्हा एकदा नव्याने बहर आलेला असतानाच वेद प्रॉडक्शन निर्मित आणि संतोष पवार लिखित/दिग्दर्शित ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ ह्या सुपर डुपर कॉमेडी नाटकाचा नजराणा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. शेजारी शेजारी अर्थात अगदी समोरासमोर राहणारी दोन इरसाल कुटुंबं आणि दोन्ही कुटुंबामध्ये असलेली वेगवेगळी व्यंग, सोयरीक निर्माण होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते अशी चाहूल लागताच व्यंग लपवण्याची धडपड, आणि त्यामधून निर्माण होणारे विनोद यांची अचूक सांगड घालून निर्माण झालेली गंमत म्हणजेच “हीच तर फॅमिलीची गंमत आहे’. टायमिंगचा बादशहा सागर कारंडे, बहिरा असलेल्या दादाच्या भूमिकेतही अचूक टायमिंग साधतो. शलाका पवार संपूर्ण फॅमिलीला सांभाळून घेणाऱ्या वाहिनीच्या भूमिलेला योग्य न्याय देतात. त्यांना अमोघ चंदन आणि अजिंक्य दाते यांनी नयन आणि मुकेशच्या भूमिकेत तितकीच उत्स्फूर्तपणे साथ दिलेली आहे. रमेश वाणी यांचा विसरभोळेपणा तर अफलातूनच, त्यांचा ‘करंदीकराना फोन’ हा प्रसंग तर प्रेक्षकांकडून कमालीचा लाफ्टर मिळवतो. सिध्दिरुपा करमरकर ह्या विसरभोळ्या नवऱ्याची बायको आणि मुलीच्या आईच्या भूमिकेत सहज वावरतात. व्यावसायिक नाटकात पदार्पण करत असलेल्या सायली देशमुखने पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली आहे. दिग्दर्शक संतोष पवार ‘पॉवरटच्’मुळे नाटक गतिमान करण्यात यशस्वी झालेले आहेत. प्रकाश योजना आणि संगीत उत्तम, तर संदेश बेंद्रे यांचे कल्पक नेपथ्य विशेष उल्लेखनीय आहे. संपूर्ण फॅमिलीला एकत्रितपणे एन्जॉय करता येईल असे निखळ विनोदी नाटक, प्रेक्षकांसाठी ‘फुल्ल टू धमाल’ तर आहेच शिवाय पैसा वसूल करणारी फॅमिलीची गंमतीदार एंटरटेनमेंटदेखील आहे.
ओंकार रसाळ (बोरिवली)
ह्या नाटकाचे लेखन दिग्दर्शन संतोष पवार यांनी केले आहे. ह्या नाटकात प्रत्येक वाक्यात विनोद आहेत. ह्या नाटकात दोन फॅमिलीची गंमत दाखवली आहे. सागर कारंडे यांनी खूपच छान आणि सहज वावर नाटकात केला आहे. तसेच इतर कलाकारांनीही खूप छान अभिनय केला आहे. नेपथ्यही खूप उत्तम केले आहे. मी आवाहन करतो की जास्तीत जास्त जणांनी हे नाटक बघावं. कारण खूपच विनोदी आणि मनोरंजनात्मक नाटक आहे आणि हे नाटक मला Rangabhoomi.com ह्यांच्या मुळे बघण्याची संधी मिळाली. त्यामुळे खूप खूप धन्यवाद Rangabhoomi.com चे. नाट्यक्षेत्रातील अपडेट कळण्यासाठी नक्की Rangabhoomi.com या वेबसाईटला भेट द्या.
सुमित हेमंत शिंदे (बोरिवली)
नाटक म्हणजे एक विलक्षण कलाकृती… आणि त्यातही विनोदी नाटक म्हणजे दुग्ध शर्करायुक्त योगच! वेद प्रॉडकशन प्रस्तुत संतोष पवार दिग्दर्शित ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे तुफान विनोदी नाटक पाहायचा योग आला. अतिशय उत्कृष्ट विनोदी नाटक आहे. कलाकारांची निवडही अचूकपणे केली आहे. सर्व कलाकारांनी उत्तमपणे भूमिका बजावल्या आहेत. नाटकाचं संगीत विशेष लक्ष वेधून घेतं. नेपथ्य अक्षरशः डोळ्यासमोर वास्तविकपणे उभं राहतं. नाट्यरसिकांना पोट धरून हसवणारं धम्माल विनोदी नाटक. विनोदाच अचूक टाईमिंग साधतं आणि प्रेक्षकांची साथ यामुळे नाटक अधिक फुलत जातं. कौटुंबिक विषयावर भाष्य करणार नाटक आहे. जरूर कुटुंबाने जाऊन पाहावं असं नाटक आहे. ५ वर्षाच्या मुलापासून ते ७० वर्षाच्या वयोगटातील लोकांपर्यंत सर्वांनी कुटूंबासोबत पहावं असं हे नाटक आहे. एक फुल्ल ऑन फॅमिली एंटरटेनमेंट ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे!’ भन्नाट विनोदी नाटक जरूर पाहावं असं.
सर्व विजेत्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन! आणि तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्या प्रतिक्रियांबद्दल आभार… आम्ही लवकरच एका नव्या नाटकासह नवीन Giveaway घेऊन हजर होऊ. तोपर्यंत नाटकं बघत राहा मंडळी!