झपूर्झा तेजस्वी दशक महोत्सव २०२२, १६ सप्टेंबर दुपारी ४:३० पासून गडकरी रंगायतन, ठाणे येथे साजरा होणार आहे. झपूर्झाचा पहिल्या टप्प्यात काव्ययोग कार्यक्रम पार पडला आहे. हा कार्यक्रम कवितेवर होता. झपूर्झा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात १२ नाट्यविष्कार असणार आहेत. तसेच व्यास क्रीएशन प्रकाशित ‘शब्दझपूर्झा’ नावाचा अंक दरवर्षीप्रमाणे सादर करणार आहे. झपूर्झाची तयारी जोरात सुरू झाली आहे. १० वं वर्ष असल्याकारणाने सर्व गोष्टीचा समावेश झपूर्झा मध्ये करण्यात आला आहे.
गेले कित्येक दिवस आम्ही रंगभूमी.com च्या माध्यमातून तुम्हाला झपूर्झा तेजस्वी दशक महोत्सवाबद्दल अपडेट्स देत आहोत. १२ वेगवेगळे नाट्याविष्कार प्रेक्षकांना या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. एकाच दिवशी एकाच तिकिटात प्रेक्षकांना या सोहळ्याचा आस्वाद घेता येणार आहे.
तिकीट विक्री येथे सुरु →
सध्या तालमी सुरू आहेत. तालमीत अनेक घटना विनोदी प्रसंग घडत असतात. एकाच वेळेस अनेक नाटकं, नृत्य असल्या करणाने दिवसभर तालमी सुरू आहेत. आपलं नाटक पूर्ण व्हावं तसंच प्रेक्षकांसमोर जाण्याआधी नीट बसावं यासाठी सगळेच कलाकार प्रयत्न करत आहेत. कलाकारांकडून उत्तम झपूर्झा सादर व्हवा यासाठी लेखक, दिग्दर्शक सतत मेहनत करून घेत आहेत. कारण प्रेक्षकांसमोर जाताना नाटकांच्या दर्जामध्ये कुठेच तडजोड करायची नाही हाच एक उद्देश झपूर्झाने ठेवला आहे. ह्यात सगळ्या आविष्कारांमध्ये ‘तेज’ हा विषय common आहे. त्याला केंद्रस्थानी ठेऊन ही सगळी नाटकं सादर होणार आहेत.
झपूर्झा मध्ये यावर्षी सादर होणारी नाटक पुढील प्रमाणे:
१. कश्याला उद्याची बात?
लेखक-दिग्दर्शक: डॉ.क्षितिज कुलकर्णी
२०८८ मधील एक प्रेमकथा.
२. D – Super Squad
एक अनोखं नृत्य नाट्य.
संकल्पना: डॉ. क्षितिज कुलकर्णी
नृत्य दिग्दर्शक: कार्तिक हजारे
३. होणार सून मी ‘त्या’बॅचची
लेखक-दिग्दर्शक: अवधूत यरगोळे
४. स्वप्नांतल्या कळ्यांनो
लेखक: डॉ. क्षितीज कुलकर्णी
दिग्दर्शक: अवधूत यरगोळे
५. सूर्यफूल संदूक
लेखक-दिग्दर्शक: डॉ. क्षितिज कुलकर्णी
६. संगीत आख्यान कानसेन युनिव्हर्स
लेखक-दिग्दर्शक: डॉ. क्षितीज कुलकर्णी
७. अरिस्टोस्टल दुणे अंबानी
लेखक-दिग्दर्शक: डॉ. क्षितिज कुलकर्णी
८.गोळी घे
लेखक-दिग्दर्शक: डॉ. क्षितिज कुलकर्णी
९. मोकळे आकाश
लेखक-दिग्दर्शक: सौ. साधना पाटील
१०. बाते कर होश मै
लेखक-दिग्दर्शक: हेमांगी कुळकर्णी संभूस
११. चलत मुसाफिर मोह लिया रे
लेखक-दिग्दर्शक: डॉ. क्षितिज कुलकर्णी
१२. Fire & Ice
ही सर्व नाटकं व नृत्य नाटकं झपूर्झा च्या १ दिवसामध्ये सादर होणार आहेत. यामध्ये प्रत्येक नाटकाची थीम संकल्पना वेगळी आणि नवीन आहे. प्रेक्षकाला नवीन काहीतरी देण्यासाठी झपूर्झा ची निर्मिती झाली आहे. १०व्या वर्षापर्यँतच्या प्रवासात अनेक अडथळे आले तरी झपूर्झाचा दर्जा कधीच डगमगला नाही. तरुण कलाकार आपल्या समोर सादर करण्यासाठी उत्सुक आहेत. लवकरच दोन दिवसांचा झपूर्झा प्रेक्षकांसमोर येईल.
तारीख – १६ सप्टेंबर २०२२
वेळ – दुपारी ४:३० पासून
झपूर्झा : तेजस्वी दशक महोत्सव
तिकिट विक्रीसाठी संपर्क – 9930175527, 8928864171, 9867985209, 7208688235.