अजेय म्हणजे हटके! अजेय म्हणजे नाविन्य! अजेय म्हणजे नवनवीन संकल्पनांचा बहर! असं म्हटलं तर अगदी समर्पक होईल. गेली १४ वर्ष अजेय संस्था ठाण्यामधे रंगभूमी , नाटक , मराठी भाषा संवर्धन या साऱ्यासाठी तसेच अशा अनेकानेक सामाजिक उपक्रमांसाठी कार्यरत आहे. यंदा झपूर्झाचे १०वे वर्ष आहे.
अजेय संस्थेतर्फे दरवर्षी झपूर्झा हा नाट्यमहोत्स सादर करण्यात येतो.
दरवर्षी काहीतरी वेगळी थीम घेऊन हा झपूर्झा रसिकांच्या भेटीला येतो. यात अनेक नाट्याविष्कार सादर होतात. यंदाही ‘तेज’ ही संकल्पना घेऊन झपूर्झा रसिक प्रेक्षकांसाठी सज्ज होत आहे.एकदा का झपूर्झा हे नाव ऐकलं की अजेय कलाकारांच्या अंगात जणू झपूर्झा फीवर चढायला लागतो.
डॅा.क्षितिज कुलकर्णींच्या संकल्पनेला साकार रूप देण्यासाठी संस्थेत अनेक वर्षे असलेले जुने सदस्य तसेच यानिमित्ताने संस्थेशी जोडले गेलेले नवोदीत होतकरू कलाकार एकजुटीने सज्ज होतात. झपुर्झाची मुळ संकल्पना संस्थेचे संस्थापक डॅा.क्षितिज कुलकर्णी असून ती संस्थेचे तरूण निर्माता श्री.गौरव संभूस यांच्या प्रयत्नातून साकार रूप घेते.
झपूर्झा चे प्रमोशन करण्यासाठी ‘फ्लॅग शो‘ ची निर्मिती करण्यात आली ती पहिल्यांदा कोविड मध्ये. कोविड मध्ये झपूर्झा करतांना प्रमोशन करण्यासाठी अडचणी होत्या कारण सर्व बंद होते या अस्वस्थते मधून फ्लॅग शो ची निर्मिती झाली. फ्लॅग शो हा दर बुधवारी आणि रविवारी सादर होतो सायंकाळी ७:३० वाजता zapurza या फेसबुक पेज वर. झपूर्झामध्ये अनेक नाट्य विष्कार असतात प्रत्येक नाट्य विष्कारातील कलाकारांना नाटका बद्दल प्रश्न विचारले जातात तसेच अनोख्या पद्धतीचे खेळ घेतले जातात. जसकी rapid fire, प्रश्न उत्तर, यातून नाटका बद्दलची उत्सुकता वाढवली जाते.
यासाठी अजेय संस्थे मधले २ निवेदक असतात. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी फ्लॅग शो चे पोस्टर दाखवले जाते व विशेष music video द्वारा कार्यक्रम सुरू केला जातो. यातील सर्व फ्लॅग शोच्या संकल्पना डॉ. क्षितिज कुलकर्णी यांच्या असतात आणि आयोजन अजेय संस्था पाहते. live सुरू झाल्याची लिंक प्रेक्षकांना पाठवली जाते. आता २ वर्षात अनेक प्रेक्षक झपूर्झाला जोडला गेला आहे.
तसेच ते सादर करत असलेल्या कलाकृतीविषयी , ते साकारत असलेल्या भूमिकेविषयी , झपूर्झात येऊन त्यांना काय शिकायला मिळालं या आणि अशा बऱ्याच विषयांवर निवेदक या सर्वांना बोलतं करतात. कलाकारंबरोबरच खऱ्या अर्थाने जे संकल्पना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात त्या दिग्दर्शकांचीही मुलाखत होते. या सर्वाबरोबरच निर्मात्याच्या चष्म्यातून , लेखकाच्या लेखणीतून ,व्यवस्थापनाच्या नजरेतून झपूर्झा कसा उलगडतो हे ही या फ्लॅगशोजमधून समजत जाते. यंदाचे हे तेजस्वी दशक महोत्सवी वर्ष असल्याने विशेष महत्वाचे आहे. दर बुधवारी व रविवारी संध्याकाळी झपूर्झा थोडा थोडा उलगडतोय तर प्रेक्षकांनी जरूर जरूर हे शोज पहावे. गप्पाटप्पा , सहभागी कलाकार , दिग्दर्शक व प्रत्येक आविष्कार आणि या सर्वातून झपूर्झा एक एक पदर उलगडावा तसा उलगडद जातो. एखादी मौल्यवान गोष्ट जशी आपण अनेक अच्छादनं घालून झाकून ठेवतो आणि एक एक अच्छादन उलगडल्याबरोबर होणाऱ्या तेजाच्या दर्शनात आपण हरवून जातो आणि ते तेज प्रत्यक्ष पाहण्याची उत्कंठा मनाला लागून राहते तसच काहीसं या फ्लॅग शोजमधून अनुभवास येतं.
यंदा flag show मधून झपूर्झामधल्या नाटकांचे दर्शन व्हायला सुरुवात झाली आहे. रसिक प्रेक्षकांना विनामूल्य कार्यक्रम पाहता येतो.
झपूर्झा फेसबूक पेज लिंक http://Fb.me/zapurza2022
flag show हा दर बुधवारी आणि रविवारी सादर होतो सायंकाळी 7.30 वाजता zapurza या फेसबुक पेज वर.
एका वाक्यात सांगायचं झालं तर झपूर्झा म्हणजे दरवर्षी नव्याने लागणारा अनोखा शोध असं म्हणता येईल.
शब्दांकन : शिल्पा कुलकर्णी
Co-ordonators
अवधूत यरगोळे: 89288 64171.
हेमांगी कुळकर्णी संभूस: 72086 88235
प्रसन्न माळी: 88503 05223
विदुला खेडकर:98679 85209