मोजक्या शब्दांत यमाचं वर्णन करायला सांगितलं तर कसं कराल? दोन शिंगं असलेला, रेड्यावर बसलेला, यम म्हणजे मृत्यूदाता, यम म्हणजे काळ… बरोबर? पण यमाची एक नवीन व्याख्या करणारं विनोदी नाटक सद्ध्या रंगभूमीवर गाजतंय. प्रवीण धोपट लिखित स्वप्नील कोकाटे दिग्दर्शित आणि नयन बाठे, दीपा परब सादर करीत आहेत दोन अंकी नाटक ‘यम इंडिकेटर’
एक मध्यमवयीन जोडपं नातेवाईकांच्या लग्नाला जायला निघालेलं असतं. इतक्यात त्यांच्या दारात ‘यम’ येऊन उभा ठाकतो! त्या दोघांपैकी एकाची वेळ आल्याचे तो त्यांना सांगतो. परंतु, यमाच्या डेटाबेसमध्ये गडबड झाल्यामुळे नेमका कोणाचा मृत्यू आज लिहिला आहे ते त्याला माहीत नसते. इथेच खरी गंमत सुरू होते. पुढे काय होतं? यम नेमकं कोणाला घेऊन जातो? नाटकाच्या नावामागे दडलेला अर्थ काय? हे सगळं जाणून घेण्यासाठी ‘यम इंडिकेटर’ या नाटकाला अवश्य भेट द्या.
आनंदाची बातमी अशी की या नाटकाची तिकिटे आपल्या वेबसाईटवरही उपलब्ध आहेत. पुढील बटनवर क्लिक करुन तुम्ही आजच तिकिटे बुक करू शकता.
नाटकाचे पुढील प्रयोग
- १७ डिसेंबर — अत्रे रंगमंदिर, कल्याण — ४ः३० वाजता
- २१ डिसेंबर — श्री शिवाजी मंदिर, दादर — ३ः३० वाजता
दिग्दर्शक स्वप्नील कोकाटे यांनी या नाटकाबद्दल एक गमतीशीर गोष्ट सांगितली आहे. ते सांगतात, “एरव्ही निर्माता बघून मग नाटकाची तयारीकेली जाते परंतु, या नाटकाचा प्रवास वेगळा होता. नाटकाच्या तालमीदरम्यान आम्हाला लक्षात आलं की नाटक छान बसतंय. पुढे आम्ही तालीम बघायला काही जणांना आमंत्रित केले. त्यांनाही हे नाटक आवडले आणि त्यांनी आमच्या नाटकासाठी निर्मात्याची भूमिका पार पाडायचे ठरवले.” असा काहीसा आगळावेगळा प्रवास करत ‘यम इंडिकेटर’ आज तुमच्या भेटीसाठी सज्ज झालं आहे.
प्रख्यात कथाकार, पटकथाकार आणि संवादलेखक शिरीष लाटकर यांनी देखील या नाटकाची खूप वाहवा केली आहे. त्यांची प्रतिक्रिया तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये पाहू शकता.
असं हे सध्या चर्चेत असलेलं ‘यम इंडिकेटर’ नाटक बघाच आणि जाणून घ्या की यम नेमकं काय इंडिकेट करायला बघतोय आपल्या सर्वांना!