ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर म्हणजेच प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या समर्थ लेखणीतून जन्माला आलेल्या “रातराणी” या अप्रतिम नाटकाचे अभिवाचन करायला काही प्रख्यात रंगकर्मी १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता आपल्या भेटीस येणार आहेत.
VISION voice-n-act या संस्थेने त्यांच्या YouTube चॅनेलवर प्र. ल. मयेकर विशेष “चला, वाचू या (पुष्प ५४ वे)” या कार्यक्रमात दोन अंकी साभिनय नाट्यवाचन आयोजिले आहे. या अभिवाचनात अरुण नलावडे, अविनाश नारकर, श्रीनिवास नार्वेकर, विनीत मराठे आणि “ऍना स्मिथ” ऐश्वर्या नारकर अशा आपल्या आवडत्या कलाकारांचा सहभाग असणार आहे. पुरुषोत्तम बेर्डे यांचा ओरिजिनल म्युझिक ट्रॅक आणि ओरिजिनल सॅली स्मिथ अरुण नलावडे यांच्यासह हा एक भारावून टाकणारा अनुभव असेल यात काही शंकाच नाही.
हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य असणार आहे. असेच अधिकाधिक दर्जेदार कार्यक्रम बघता येण्यासाठी व्हिजनचं YouTube चॅनेल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिजनची YouTube चॅनेल लिंक पुढीलप्रमाणे आहे.
चला तर, वाचूया!