बॅचलर हा शब्द ऐकताच भाड्याने रूम देणाऱ्या मालकाच्या कपाळावर नेहमी आठ्या उमटतात. त्यात शहर मुंबई असेल तर मग बघायलाच नको. समुद्रमंथन निर्मित ‘वाकडी तिकडी‘ या नाटकाची अशीच काहीशी कथा आहे.
या नाटकाच्या प्रमुख भूमिकेत अंशुमन विचारे, दिसायला भोळा पण भानगडी सोळा अशा अजाचे पात्र साकारतोय. त्याच बरोबर दिग्दर्शक श्रमेश बेटकर स्वतः संज्या या एका फटकळ व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहेत. सचिन वळंजू विजा या एका भित्र्या व्यक्तीचे पात्र साकारताना आपल्याला दिसून येतात तर हर्षदा बामने ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’ या म्हणीसारख्या सुहानीचे पात्र साकारत आहे. या नाटकात अनिल शिंदे मोडेल पण वाकणार नाही अश्या एका मालकाची भूमिका साकारतायेत. त्याचबरोबर निशांत हे चोराची भूमिका साकारताना आपल्याला दिसतात आणि तुषार शिंगाडे सचिन हे पात्र साकारतायेत. छोटा पॅकेट बडा धमाका अशी सोनाचे पात्र श्वेता कुलकर्णी साकारतेय तर काहीही नेम नसलेल्या एका वेगळ्या इंस्पेक्टरचे पात्र अमीर तडवळकर हे साकारताना आपल्याला दिसतात.
अभय परब आणि अमित परब निर्मित व श्रमेश बेटकर लिखित व दिग्दर्शित ‘वाकडी तिकडी’ हे नाटक आहे तीन बॅचलर मुलं आणि त्यांनी घालून ठेवलेल्या गमतीशीर घोळाची! या नाटकाचे सूत्रधार दीपक गोडबोले आहेत. बघायला अगदी हलकं फुलकं आणि खळखळून हसायला लावणारं वाकडी तिकडी हे नाटक तुमच्या जवळच्या प्रेक्षागृहात प्रेक्षकांना हसवायला आतुरतेने वाट बघतंय. प्रेक्षकांनी उदंड प्रतिसादात वाकडी तिकडी या नाटकाचा लाभ घ्यावा.