मध्यंतरीचा हा करोनाबाधित काळ जगभर सर्वांसाठीच अवघड ठरला आहे. या अशा नैराश्यवादी वातावरणात तग धरून राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचे असते ते म्हणजे मन मोकळे करून मनमुराद हसणे. विनोदाने आपल्याला खळखळून हसवायला रंगमंचावर पुन्हा एकदा येत आहे, अभिजात निर्मित व व्यास क्रिएशन्स प्रकाशित ‘वासूची सासू‘ हे नाटक!
वासूची सासू ह्या नाटकाने एकेकाळी रंगमंच गाजवलेला. मुख्य भूमिकेत असलेले लोकप्रिय व सगळ्यांचे आवडते कलाकार दिलीप प्रभावळकर ह्यांनी सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक व नाटककार प्रदीप साळवी ह्यांनी लिहिलेले हे पात्र अजरामर केले आहे. व आता अभिजात व व्यास क्रिएशन्स सह, दिग्दर्शक दुर्गेश मोहन कलाकारांच्या नव्या टोळीसह हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर घेऊन येत आहेत.
वासूची सासू हे एक मराठी विनोदी नाटक आहे. ही कथा आहे वासू, त्याचा घरमालक व त्याच्या कुटुंबाची. वासूची गर्लफ्रेंड शीतल ही त्याच्या घरी येणार असते व त्या करिता वासूला कामावरून सुट्टी घ्यायची असते. तो त्याच्या अधिकाऱ्याला आपली सासू वारल्याचे खोटे कारण पुढे करतो. त्याचं हे खोटं जिरून जाईल की वासू पकडला जाईल? काय गोंधळ उडेल, वासू सगळे कसे सांभाळून घेईल, अजून किती खोटं बोलेल व त्याची तारांबळ कशी उडेल ही सगळी गंमत वासूची सासू ह्या नाटकात आपल्या डोळ्यासमोर रंगभूमीवर उघडेल.
Vaasuchi Saasu Marathi Natak Cast
नाटकात अभिजीत केळकर, अंकुर वाढवे, संजना पाटील, अथर्व गोखले, आकाश भडसावळे व तपस्या नेवे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसून येतात. वासूची सासू ह्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ४ फेब्रुवारी २०२२ रोजी, गडकरी रंगायतन, ठाणे, येथे पार पडला. तेव्हा प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद देऊन वासूची सासू हे नाटक रंगभूमीवर जाऊन नक्की पहा व पोट धरून हसायला तयार रहा. तुम्ही www.bookmyshow.com वरून तिकिटे बुक करू शकता.