गेली १० वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर सातत्याने कार्यरत असलेल्या थिएट्रॉन एंटरटेनमेंट या संस्थेने झी नाट्य गौरव पुरस्कार, मटा सन्मान, मेटा, थेस्पो, द रेड कर्टन इंटरनॅशनल इ. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक नामांकने आणि बक्षिसे पटकावली आहेत. त्याचबरोबर, ही संस्था रंगभूमीवर नवनवीन प्रयोग करून पुण्यातील नाट्यरसिकांचे लक्ष वेधून घेत आली आहे. ‘थिएट्रॉन एंटरटेनमेंट’ आणि ‘स्नेहा भावे प्रोडक्शन्स’ निर्मित ‘वार्ता वार्ता वाढे’ हे मानवी प्रवृत्तीवर भाष्य करणारं एक नवीन विनोदी नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे या नाटकात ६० हून अधिक कलाकार एकाच वेळी रंगमंचावर काम करताना आपल्याला दिसणार आहेत. या नाटकाचे लेखन ओंकार गोखले यांनी केले असून, सुरज पारसनीस हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत.
एका बातमीचे चुकीच्या पद्धतीने आकलन झाल्यामुळे उडणारा गोंधळ आणि त्यातून तयार होणारे समज आणि गैरसमज या विषयावर हे नाटक उभं आहे. या नाटकात मानवी प्रवृत्तीवर अगदी मिश्किलपणे भाष्य केले आहे. त्यामुळे हा मनोरंजक विषय, नवीन गाणी, आणि एकाच वेळी रंगमंचावर विविध पार्श्वभूमीचे मोठ्या संख्येने सादरीकरण करणारे कलाकार हे दृश्य अगदी पाहण्याजोगे असेल. आता एवढे कलाकार एकत्र आल्यावर रंगमंचावर गोंधळ उडेल की हा प्रयोग यशस्वी ठरेल? हे जाणून घेण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी ‘वार्ता वार्ता वाढे’ हे नाटक नाट्यगृहात जाऊन अवश्य पहावे.
दि. १ जुलै रोजी भरत नाट्यमंदिर, पुणे येथे रात्री ९.३० वाजता ‘वार्ता वार्ता वाढे’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडणार आहे. हे नाटक प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी असणार, यात शंका नाही. तेव्हा रसिकांनी मोठ्या संख्येने या नाटकास उपस्थित रहावे, असे आवाहन थिएट्रॉन एंटरटेनमेंट या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
तिकिटासाठी संपर्क: ७०५८८८३०४९
www.ticketkhidakee.com या संकेतस्थळावरही या नाटकाची तिकिटे उपलब्ध आहेत.
वार्ता वार्ता वाढे! नाटकाची टीम
निर्माते – थिएट्रॉन एंटरटेनमेंट आणि स्नेहा भावे प्रोडक्शन्स
लेखक – ओंकार गोखले
दिग्दर्शक – सुरज पारसनीस
संगीत – अमोघ इनामदार
ध्वनी संयोजन – विक्रांत पवार
प्रकाशयोजना – संकेत पारखे
रंगभूषा – देविका काळे
गीतकार – संकेत पारखे
नेपथ्य आणि बॅकस्टेज – अदित्य यादव आणि संकेत पारखे
आणि ६० हरहुन्नरी कलाकार!