नाटकांमार्फत रंगभूमीवर अनेक समाज प्रबोधनात्मक विषयांची मांडणी केली जाते. राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक विषयांवर भाष्य केले जाते. दोन नेत्यांमधील वाद असो किंवा दोन घरातील वाद, तो सामाजिक विषयच समजला जात. पण, दोन लहान मुलांमध्ये झालेले वाद समाजिक विषयांचे कशाप्रकारे दार ठोठावते हे मांडण्यासाठी राखाडी स्टुडिओ व अमेय गोसावी निर्मित उच्छाद हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग १२ व १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता द बेस, एरंडवणे, पुणे येथे होणार आहेत.
‘उच्छाद’ हे नाटक यास्मिना रेझा यांच्या ‘गॉड ऑफ कार्नेज’ या प्रसिद्ध फ्रेंच नाटकाचा निरंजन पेडणेकर यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. मुलांच्या खेळीच्या वातावरणात एका मुलाकडून दुसऱ्या मुलाचे दात तुटले जातात. मुलांनी केलेल्या किरकोळ भांडणाचा गुंता सभ्यपणे सोडवण्यासाठी एक जोडपं दुसऱ्या जोडप्याला घरी बोलवतं. पण ही बैठक हळूहळू एका वेगळ्याच दिशेने जाऊन सभ्यतेचे बुरखे कसे फाडते, याचे चित्रण या नाटकात आहे. हे नाट्यरुपांतर शहरात वसलेले असून पुरुषप्रधान संस्कृती, वर्ग-जात याबद्दलचे पूर्वग्रह, समाजसुधारणेचा दिखावा आणि शिष्टाचाराचा उथळपणा यांवर नर्मविनोदातून भाष्य करते.
राखाडी स्टूडियो ने हल्लीच प्रस्थान उर्फ EXIT हे नाटक रंगभूमीवर आणलं आहे. मकरंद साठे लिखित आणि आलोक राजवाडे दिग्दर्शित या नाटकात सुहिता थत्ते, गजानन परांजपे, व तुषार टेंगले हे कलाकार आहेत.
दिग्दर्शक: अनुपम बर्वे
“गेले अडीच महिने आम्ही या नाटकाची तालीम करत आहोत. या नाटकात आम्ही ब्लॅक कॉमेडी पद्धतीने कथा मांडली आहे. एक पालक म्हणून जबाबदार प्रौढ भूमिकेत जगत असताना आंतर्गिक गोष्टी बाहेर पडल्यावर काय घडू शकते हे या नाटकातून आम्ही मांडत आहोत.”
— अनुपम बर्वे
लेखक: निरंजन पेडणेकर
“२०२० साली मी या नाटकावर काम करण्यास सुरुवात केली. या नाटकावर अनेकांनी लेखन केल्याचे समजले होते, पण परवानगी मिळत नसल्याने त्याचे नाटक रुपांतर झाले नव्हते म्हणून मी हा प्रयत्न करण्याचे ठरविले आणि माझ्या गोष्टीला आणि केलेल्या तयारीला परवानगी मिळाली. या कथेत मी वाक्यांमध्ये काही बदल केले नसून काही संदर्भामध्ये बदल केले आहेत.”
— निरंजन पेडणेकर
उच्छाद मराठी नाटक
मराठी नाट्य रूपांतर: निरंजन पेडणेकर
दिग्दर्शन: अनुपम बर्वे
निर्माता: अमेय गोसावी
कलाकार:
सायली फाटक: वनिता
सिद्धेश धुरी: मयूर
तन्वी कुलकर्णी: अनिशा
निरंजन पेडणेकर: अनिरुद्ध
Uchchhaad Marathi Natak – Upcoming Shows
राखाडी स्टुडिओ आणि सर्व कलाकार मंडळींना यशस्वीपणे उच्छाद मांडण्यासाठी रंगभूमी.com कडून शुभेच्छा.