कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेले बरेच महिने तमाम रसिक प्रेक्षक रंगभूमीच्या दर्शनास मुकले आहेत हे आपण सर्वजण जाणूनच आहोत. त्यांना रंगभूमीकडे नेणे तर सध्या अशक्यच! पण या कठीणसमयी रंगभूमीच प्रेक्षकांच्या घरी आणून पोहोचवण्याची किमया करणारे किमयागार म्हणजे अभिजीत झुंजारराव! सर्वत्र नैराश्याचे वातावरण पसरलेले असताना जिथे एका संस्थेचे एक नाटक उभे करणे कठीण होते तिथे अभिनय कल्याण संस्थेचे सर्वेसर्वा श्री. अभिजीत झुंजारराव यांनी ४ विविध शहरांमधील ४ विविध संस्थांची ४ विविध धाटणीची बहुरंगी नाटकं Online माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा प्रयोग नुकताच यशस्वीरीत्या पार पाडला आहे.
See Also: बहुगुणी रंगकर्मी अभिजीत झुंजारराव यांच्याशी गप्पा
TPL 2020 म्हणजेच थिएटर प्रीमियर लीग या नाट्यमहोत्सवात अभिनय कल्याणसोबत प्रयोग मालाड (मुंबई), परिवर्तन (जळगाव), कलांश थिएटर (रत्नागिरी) या तीन संस्था सक्रियपणे सहभागी झाल्या. या चारही संस्थांचे ध्येय एकच होते –उत्कृष्ट लेखनावर आधारित सादरीकरणाचा जिवंत नाट्यानुभव प्रेक्षकांपर्यंत घरपोच पोहोचवण्याचे!
थिएटर प्रीमियर लीग नाट्यमहोत्सवात आमच्या रंगभूमी.com च्या टीमलाही सहभागी होता आले हे आम्ही आमचे भाग्यच समजतो. रंगभूमी.com च्या तांत्रिक सहाय्याने TPL ने जास्तीत जास्त शहरांच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुकचा वापर केला. तसेच, तिकीट दर खूपच कमी ठेवल्यामुळे सामान्य प्रेक्षकांपर्यन्त हा उपक्रम सहजगत्या पोहोचला. २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या या नाट्यमहोत्सवात चार दर्जेदार लेखकांच्या लेखणीने समृद्ध अशा नाटकांचे उत्कृष्ट सादरीकरण झाले. सुमारे ४०० लोकांनी घर बसल्या या उपक्रमाचा यथेच्छ आनंद घेतला.
TPL 2020 चा RETAKE
तुम्हाला या प्रवासात सहभागी होता आले नसेल तर काळजी करू नका. कारण TPL तुमच्यासाठी घेऊन येत आहे RETAKE! लोकाग्रहास्तव हा नाट्यमहोत्सव येत्या शनिवार आणि रविवारी म्हणजेच ३ व ४ ऑक्टोबरला पुन्हा दाखवण्याचा निर्णय संपूर्ण टीमने घेतला आहे. ज्याचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल.
या प्रयोगांची तिकिटे पुढील लिंकवर उपलब्ध आहेत.
RETAKE: Theatre Premier League 2020 / थिएटर प्रीमियर लीग २०२०
आणि विसरू नका… हा शेवट नाही तर हे एक नवे पर्व आहे. TPL चे पर्व! थिएटर प्रीमियर लीग काहीच दिवसात सिझन २ घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे. नवीन नाटकं घेऊन आणि बरीच surprises घेऊन! तोपर्यंत पहिल्या सिझनचा आनंद घ्या आणि तुमचा पाठिंबा सदैव आमच्या पाठीशी राहू द्यात हीच विनंती!