रविवार दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११ वाजता डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रेक्षकांना एकाच तिकिटात दोन लघुनाटिका बघता येणार आहेत.
या प्रयोगाची तिकिटे आपल्याच वेबसाईटवर उपलब्ध आहेत. पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रयोगाची तिकिटे बुक करू शकता.
नाट्यदिंडी (भगदाड + नवरा आला वेशीपाशी) याचे तिकीट बुकिंग
नवरा आला वेशीपाशी
आपलं दुःख कुणालाच कळणार नाही, कुणी ते समजूनच घेऊच शकत नाही, असं प्रत्येकाला आपल्या कुठल्यातरी दुःखाबद्दल वाटत असतंच ना…? तेव्हा ते दुःख ऐकून, समजून घेऊन त्यावर फुंकर घालणारं कुणीतरी भेटायची आपल्याला गरज असते आणि त्यात ज्याला आपण दुःख म्हणतोय ते मुळात दुःखच नाही असं काहीतरी सांगणारं समजावणारं कुणीतरी आपल्याला भेटलं तर सोन्याहून पिवळं. एकमेकांशी लग्न ठरलेल्या अशाच दोन अनोळखींची गोष्ट म्हणजे, ‘नवरा आला वेशीपाशी’. कुणाचं दुःख, काय दुःख आणि कोण त्यावर कशी फुंकर घालणार? हसत-खेळत आणि थोडं मनाला चटका लावत हीच गोष्ट अनुभवा.
भगदाड
द. मा. मिराजदार ह्यांच्या कथेवर आधारीत एकांकिका ‘भगदाड ‘. घराला भगदाड पडतं म्हणजे फक्त भिंत कोसळते का..? स्वप्न तुटतात.. नाती दुरावतात आणि खिसा ही रिकामा होतो रिकाम्या भिंतींसारखा… हल्ली दुःखाचा बाजार एवढा वाढलाय की माणुसकी हरवत चालीये. दुःख ही साजरं करतात लोक हल्ली, पण सर्वसामान्य त्याच्या परिस्थितीमुळे वर्षानुवर्षे दुःखीच असतो. त्यात जर घरात चोरी झाली तर काय कराव. गावाला अप्रूप वाटेल अशी चोरी. ह्या चोरीच्या फार गमती जमती पाहायच्या असतील तर नक्की पाहायला या.