[Please check the updated news at bottom of this article]
राज्यात कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. तसेच, ओमायक्रोनचे नवीन संकट डोक्यावर येऊन उभे राहिले आहे. ओमायक्रोनचे बाधित रुग्णांच्या आकड्यातही वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच या सगळ्या गोष्टींचा विचार करुन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी राज्य नाट्य स्पर्धा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा काही दिवसांपूर्वी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्याबद्दलचा संपूर्ण तपशील तुम्हाला पुढील लिंकवर वाचता येईल.
राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका दाखल करण्यासाठी व सादरीकरणासाठी १५ दिवसांची मुदतवाढ
कोरोना आणि ओमायक्रोनचे रुग्ण वाढताना दिसत असल्याने ही स्पर्धा मे आणि जून, २०२२ मध्ये घेतली जाणार असल्याचे अमित देशमुख यांनी स्पष्ट केले. तरीही सर्व स्पर्धक संस्थांनी या बदलाची नोंद घ्यावी.
Update
राज्य नाट्य स्पर्धा ठरलेल्या वेळेतच संपन्न होणार…
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी स्पर्धा आयोजनाची प्रक्रिया सुरू झाली असून, १५ जानेवारीपासून स्पर्धेस सुरुवात होणार आहे.
आज सकाळपासून समाज माध्यमावर ‘राज्य नाट्य स्पर्धा पुढे ढकलल्या जात आहेत’; अशा आशयाचे मजकूर प्रसारित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही रंगकर्मींनी याबाबत फोन करूनही विचारना केलेली आहे.
या निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात येते की, राज्य नाट्य स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच संपन्न होतील. कोविड विषयक सर्व नियमावलीचे पालन करून व खबरदारी घेऊन रंगकर्मीनी प्रयोगांचे सादरीकरण करावे.
समाज माध्यमावरील प्रसारित झालेल्या मजकुराच्या अनुषंगाने सदर निवेदन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येत आहे.