शाईन क्रीएशन्स सादर करीत आहेत एकाच तिकिटात दोन एकांकिका! या एकांकिका आहेत ‘मी… श्रीकृष्ण पेंडसे‘ आणि ‘नाटक बसते आहे‘! या दोन्ही एकांकिका डॉ. शुक्लिमा पोटे यांनी दिग्दर्शित केल्या आहेत. या एकांकिकांचे सादरीकरण २४ जुलै रोजी सुदर्शन रंगमंच, पुणे येथे सायंकाळी ६:३० वाजल्यापासून सुरू होणार आहे.
सादर होणाऱ्या एकांकिका
मी… श्रीकृष्ण पेंडसे
लेखक — विनोद भट
दिग्दर्शिका — डॉ.शुक्लिमा पोटे
एका पावसाळी आणि गडगडाटाच्या रात्री असहाय्य, स्वत:ला सज्जन भासवणारा एक माणूस (श्रीकृष्ण पेंडसे) नंदन आणि शुभदा कारखानीस यांच्या घरी येतो. स्वतःला जंटलमन म्हणवणाऱ्या पेंडसेची भिकार्यासारखी अवस्था का झाली असेल…? कारखानीस जोडप्याची ही उत्सुकता, त्यांना पेंडसेच्या रोमांचकारी आणि सत्यप्रवासाचे दर्शन घडवते. पुढे पेंडसेची कथा इथेच न थांबता, ती कारखानीसांच्या आयुष्यातही उलथापालथ करते. काय घडतं…? कसं घडतं…? का घडतं…? हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की पहायला या.
नाटक बसते आहे
लेखक — वि वा.शिरवाडकर
दिग्दर्शिका — डॉ. शुक्लिमा पोटे
नाटक बसविण्याची हौस या सर्वांना फार…
बसविताना मात्र गफलती हजार…
कोणाचा संगीत क्लास, कोणाची रेस…
ऐन तालमीच्यावेळी सगळे पसार…
आता पिठातल्या प्रेक्षकांना काय दाखवणार…?
याचं नाटक बसतं की फसतं…
हे पहायला नक्की या.
अशा गमतीशीर काव्यामध्ये या नाट्याचे वर्णन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची तिकटे पुढील लिंकवर उपलब्ध आहेत.
www.ticketkhidakee.com/mspnatakbasteahe_24jul
तिकीट आणि अधिक माहितीसाठी संपर्क
अमोल पुजारी — ९१५८३७४०२२
धनंजय वारे — ८१४९७२६५७५
विषय वाचून, ही दोन्ही नाटकं अतिशय मनोरंजक आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी असतील याबद्दल आम्हाला तिळमात्र शंका नाही. त्यामुळे सहकुटुंब, सहपरिवार जरूर भेट द्या येत्या रविवारी या नाटकांना!