दरवर्षी अजेय संस्थेतर्फे फेब्रूवारी-मार्च दरम्यान ‘शब्दसेल्फी‘ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. लॉकडाऊनमुळे मध्यंतरीच्या काळात हा कार्यक्रम पार पडू शकला नाही. पण या वर्षी हा कार्यक्रम पुन्हा सादर होणार आहे. २२ डिसेंबर, २०२१ रोजी रात्री ८ वाजता ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम प्रेक्षकांना बघता येणार आहे.
‘शब्दसेल्फी‘ची संकल्पना एकदम वेगळी आहे. हा कवितांवर आधारित कार्यक्रम आहे. पण, इतर कार्यक्रमाप्रमाणे फक्त काव्यवाचन नाही. या कार्यक्रमांतर्गत काव्यनाट्य, काव्यश्रुंखला, काव्यचित्रपट, काव्यांकिका, काव्यमेडली अशा विविध प्रकारांचा वापर करून कवितेमधील आशय घेऊन कविता सादर केल्या जातात. या कार्यक्रमाची संकल्पना लेखक, दिग्दर्शक डॉ. क्षितिज कुलकर्णी यांची आहे. अनेक महिने या विषयावर अभ्यास करून, निरनिराळी पुस्तकं वाचून कवितांची निवड करून याची संहिता तयार केली जाते. तसेच, पाच ही वर्षी याचे वेगळेपण संकल्पनाकार डॉ. क्षितिज कुलकर्णी यांनी जपले आहे. या कार्यक्रमाचा निर्माता गौरव संभूस आहे. शब्दसेल्फीचे निवेदक डॉ. क्षितीज कुलकर्णी व राजस वैद्य असणार आहेत. या कार्यक्रमात अजेय संस्थेची टीम काम करत आहे व आयोजनही पाहत आहे.
या वर्षी ‘शब्दसेल्फी’ चा विषय कँडिड रोमँटिक मराठी असा आहे. यात मराठीमधल्या रोमँटिक कविता आणि त्यावर सादरीकरण दाखवले जाणार आहे. जुन्या मराठी रोमँटिक गाण्यांवर आजही तितक्याच जोशात थिरकणारी तरुण पावलं अर्थात नृत्यही सादर होणार आहेत. मराठी कवी आणि कवितांचा, त्यांच्या शब्द-अर्थांचा आजच्या काळाच्या संदर्भाने शोध घेणारा एकमेव मराठी कार्यक्रम म्हणजे ‘शब्दसेल्फी’! या वर्षी शब्दसेल्फी मध्ये अनोखा प्रयोग सादर होणार आहे. एक युवा टीम, शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त, शांता शेळके यांच्या काही गाण्यांवर नृत्य सादर करणार आहे. याचे नृत्य दिग्दर्शन कार्तिक हजारे करत आहे. रोमँटिक मराठी कविता उलगडणाऱ्या या सोहळ्यात प्रेक्षकांना अभ्यासपूर्ण निवेदन अनुभवता येणार आहे.
या कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरू झाली आहे तिकीट दर १५०₹ आहे. तसेच, काही विनामुल्य प्रवेशिका उपलब्ध आहेत.
फोन बुकिंगसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा: ९९३०१७५५२७, ८९२८८६४१७१
गडकरी रंगायतन येथे कार्यक्रमाच्या तीन दिवस आधीपासून तिकीट विक्री सुरू होणार आहे.
तसंच, या कार्यक्रमाची झलक पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
→ www.facebook.com/zapurza2021