फार क्वचित नाटकं आपल्याला संवाद, वाक्यरचना, शृंगार, नेपथ्य या सगळ्यापलीकडे जाऊन एक निखळ नाट्यानुभव देऊन जातात. नाटकघर, पुणे निर्मित, रामू रामनाथन लिखित आणि अमर देवगांवकर अनुवादित ‘शब्दांची रोजनिशी’ हेदेखील याच धाटणीतील एक अनोखं नाटक! आनंदाची बातमी अशी की या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग १२ जून रोजी, औरंगाबाद येथे सादर होणार आहे.
अतुल पेठे यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाची व प्रकाशयोजनेची धुरा सांभाळली आहे. या नाटकात दोन पात्रं आहेत. अतुल पेठे आणि केतकी थत्ते या बहुगुणी कलाकारांनी दोन्ही व्यक्तिरेखा अतिशय सुंदर साकारल्या आहेत. या नाटकाबद्दल सांगताना अतिशय मिश्किलपणे अतुल पेठे म्हणतात की, “या नाटकात दोन कथा आहेत. जगातील कुठल्याही भाषेत असतात तशा त्या सुरस आणि चमत्कारिक आहेत. अशा कथा मनोरंजन करतात आणि क्लेशही देतात. त्या अनाकलनीय, अतर्क्य, अघटित इ. असतात. त्या ख-या किंवा कल्पित असतात. तर अशा कहाण्यांची गोष्ट कशी सांगावी? आणि ती आधीच सांगून का टाकावी? ‘सगळं एका क्लिक वर कळतं’ अशा आजच्या जमान्यात जरा सस्पेन्स राहूदे की. शिवाय नाटक खेळायच्या आधीच त्याबद्दल लिहित राहिलं तर शब्द आटतील, नाही का? तर पहिली घंटा होण्या आगोदर एक गोष्ट मात्र निश्चितपणे सांगता येईल की शब्दांची रोजनिशी हा अस्सल नाट्यानुभव आहे!” या संदेशातून दिग्दर्शकाला प्रेक्षकांनी नाट्यगृहात येऊनच हे नाटक बघणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट दिसून येते.
दिनांक ११ जून २०२२ (शनिवार) रोजी ‘शब्दांची रोजनिशी’ या नाटकाचा खास लोकाग्रहास्तव ४९ वा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
वेळ: सायंकाळी ७ वाजता
स्थळ: सजग रंगमंच, वैद्य बंगला, प्लॉट नं.२६, नवविनायक सोसायटी, महात्मा सोसायटीजवळ, कोथरूड
तिकीट दर: ३००/- ₹
संपर्क: रोहिणी पेठे 9423014362
(सविस्तर पत्ता: कोथरूड- डहाणूकर – गांधीभवन महात्मा सोसायटी मुख्य कमान आत शिरून उजवीकडे वळा – लगेच डावीकडे वळा – हा रस्ता क्र.११ – तिथून सरळ – महात्माची शेवटची कमान लागेल. ती ओलांडताच – डावीकडे नवविनायक पाटी दिसेल – आत सोसायटीत नाटकाच्या पाट्या लावलेल्या दिसतील. पार्कींग ‘सजग रंगमंच’ समोरील मैदानात आहे. प्रयोगाआधी चहाची व्यवस्था)
सुवर्णमहोत्सवी प्रयोग
रविवार दिनांक १२ जून २०२२ रोजी या नाटकाचा यशस्वी ५० वा प्रयोग पार पडणार आहे.
वेळ: सायंकाळी ५ वाजता
स्थळ: विनोबा भावे सभागृह, एम. जी. एम. कॉलेज ऑफ जर्नलिस्म, एन-६ सिडको, औरंगाबाद
शब्दांची रोजनिशी नाटकाच्या संपूर्ण टीमला ५० व्या प्रयोगासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
शब्दांची रोजनिशी नाटकाची संपूर्ण टीम
लेखन: रामू रामनाथन
अनुवाद: अमर देवगांवकर
प्रकाशयोजना,दिग्दर्शक: अतुल पेठे
नेपथ्य: प्रदीप मुळ्ये
संगीत: साकेत कानेटकर
ध्वनी संयोजन: यज्ञेश आंबेकर
प्रकाशयोजना साहाय्य: सागर डहाळे
रंगमंच: आदित्य संतोष आणि श्याम शिंदे
कलाकार: केतकी थत्ते, अतुल पेठे