सत्कर्व मुंबई अयोजित ऑनलाईन नाट्यशिबिर पुन्हा एकदा सुरू होणार आहे. १५ मे, २०२१ रोजी ह्याचे पहिले नाट्यशिबिर झाले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला म्हणूनच पुन्हा एकदा शिबीर राबवण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
पहिल्या शिबिराला सचिन गोताड (नेपथ्य व कलादिग्दर्शक),राजेश कोळंबकर (लेखक), सुनील परब (सिनेदिग्दर्शक), राजू वेंगुर्लेकर (नाट्यदिग्दर्शक), भूषण देसाई (प्रकाशयोजना), स्मिता कोळी (वेशभूषा), श्रीनाथ म्हात्रे (संगीत) तसेच सुनील गोडबोले उर्फ अप्पा (अभिनय) ह्यांनी मार्गदर्शन करून सर्व नवोदित कलाकारांना ऊर्जा व प्रेरणा दिली.
२० जून ते २८ जून २०२१ यादिवशी संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत पुन्हा एकदा ह्या ऑनलाईन नाट्यशिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. संपूर्ण शिबिराची फी रु. १५००/- असणार आहे. फी भरण्याची अंतिम तारिख १८ जून आहे.
सर्व कलाकारांना उत्तम मार्गदर्शन मिळून पुन्हा नव्याने स्फूर्ती, उत्साह, आणि प्रेरणा मिळावी ह्यासाठी सत्कर्व, मुंबईचा हा प्रयत्न नक्कीच वाखणण्याजोगा आहे.