मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे मानले जाते. विष्णूदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. गायनाचार्य भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव, पं. राम मराठे, पं. जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व, केशवराव भोळे असे दिग्गज संगीतरचनाकार (संगीतकार) लाभल्याने मराठी नाट्यसंगीत समृद्ध झाले. अशा आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे वृद्धिंगत करण्यासाठी बालगंधर्व कला अकादमी परिवार आयोजित करत आहे राज्यस्तरीय संगीत एकांकिका स्पर्धा. हे या स्पर्धेचे पहिलेच वर्ष. ‘रंगभूमीवरील नवे पर्व, लवकरच संगीत बालगंधर्व’ ही संकल्पना माननीय श्री. किशोर कुमार यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणली.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी ८ आणि ९ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. स्पर्धकांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता आणि देशभरातील सर्व संघांना सहभागी होणे सोयीस्कर व्हावे म्हणून आयोजकांनी प्राथमिक फेरी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नियम आणि अटी
- प्राथमिक फेरीसाठी अर्ज करण्याची आणि व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत असेल.
- मराठी आणि हिंदी भाषेत स्पर्धा होईल.
- नाटकासाठी नेपथ्य टाळता येऊ शकते. स्पर्धक संघ प्रोजेक्टरवर डिजिटल इमेज किंवा व्हिडिओ लावू शकतात.
- लांबून येणाऱ्या स्पर्धकांसाठी राहण्याची सोय असेल.
- संगीत एकांकिका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क २००० रुपये इतके असून ते (९८९२९०३०७६) या नंबरवर गूगल पे करावे अथवा QR code scan करावे आणि प्रवेश अर्जासोबत ऑनलाइन प्रवेश शुल्क भरल्याचा स्क्रीन शॉट पाठवावा.
- प्रवेश व्हिडिओ AVI, WMV, MP4 फॉरमॅटमध्ये असावा.
- स्पर्धकांनी एकांकिकेचे व्हिडिओ फाइल्स आणि प्रवेशअर्ज [email protected] या ईमेल आयडीवर लिंकच्या स्वरूपात सबमिट करावे.
- संगीत एकांकिकेची स्पर्धा असल्यामुळे नाटकातील संगीत आणि अभिनय यांवर भर देऊन परीक्षण केले जाईल. सादरकर्ते हे विद्यार्थी किंवा अनुभवी नायक, वादक आणि अभिनेते, अभिनेत्री असले तरीही चालेल, याचे कुठलेही बंधन नसेल. नवोदितांना प्राधान्य देण्यात येईल.
- नाटकात श्रवणीय असे प्रत्यक्ष संगीत आवश्यक आहे.
पारितोषिके
- ५ विजेते आणि उत्तेजनार्थ
- ५ विशेष सन्मान
- विजेते वैयक्तिक आणि सांघिक यांना बालगंधर्व सन्मान चषक, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देण्यात येईल.
सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येईल.
स्पर्धेची अंतिम फेरी ही प्राथमिक फेरी नंतर एक आठवड्यात घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी बालगंधर्व परिवार – ९८९२९०३०७१ / ९८९२९०३०७६ या क्रमांकावर संपर्क करू शकता.
स्पर्धेचे अपडटेस जाणून घेण्यासाठी रंगभूमी.com ला Subscribe करा. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा.