काही दिवसांपूर्वी आम्ही ‘सम्यक कलांश प्रतिष्ठान आयोजित नाट्यगंध महोत्सव २०२२’ बद्दल इत्यंभूत माहिती देणारा लेख तुमच्या भेटीसाठी आणला होता. हा लेख तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून वाचू शकता.
नाट्यगंध महोत्सव — स्पर्धेत नजरे आड राहिलेल्या एकांकिकांच्या महोत्सवाचे ४थे वर्ष!
आज आपण या महोत्सवात सादर होणाऱ्या एकांकिकांबद्दल माहिती मिळवणार आहोत.
यावर्षी नाट्यगंध महोत्सवातील सत्कार मूर्ती आहेत ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक अजित भगत आणि म्युझिक ऑपरेटर शशिकांत (दादा) परसनाईक!
तसंच, यंदा सोहळ्याला लाभलेले प्रमुख अतिथी आहेत ज्येष्ठ लोकनृत्य दिग्दर्शक सदानंद राणे, नाट्य निर्मिती सूत्रधार प्रभाकर (गोट्या) सावंत, रंगभूषाकार वामन गमरे आणि नेपथ्यकार चंद्रशेखर मेस्त्री.
दिनांक : २९ मार्च २०२२
स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे
वेळ : सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत
ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी पुढील लिंकचा वापर करा: https://rzp.io/l/UmBYeqTxC
अधिक महितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा: +917039556896
नाट्यगंध महोत्सव २०२२ मध्ये सादर होणाऱ्या एकांकिका पुढीलप्रमाणे:
अशील (अनुराग कल्याण)
एक वेश्या अशील म्हणून आल्यानंतर वकिलीच्या व्यवसायात नव्यानेच सुरू करणाऱ्या व या निमित्ताने कोर्टात प्रथमच उभे राहणाऱ्या वकीलाची होणारी केविलवाणी धडपड व त्याच्या सर्व नीतिमत्तेच्या कल्पनांना धडाधड धक्के देणारे त्या वेश्येचे तत्वज्ञान, हा या ऐकांकिकेचा मूळ विषय आहे.
खारूदादाचा ड्रामाटिक विकेंड (नवरस कलारंग सांस्कृतिक अकादमी, बोईसर)
सामान्य माणसाची व्यथा आणि काही सामान्य माणसानी एकत्र येऊन स्वतःला व्यक्त होण्यासाठी आणि त्यांची होत असलेली गळचेपी यावर एक काल्पनिक पण क्रूर उपाय, आणि त्याची तालीम करण्यासाठी दर शनिवारी एका अज्ञात ठिकाणी भेटून राजकारणाच्या सध्याच्या स्थितीवर स्वतःच मत मांडणं.
निस्तेज झाडाच्या फांदीवर! (मुक्तछंद नाट्यसंस्था)
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या पिकाला बाजारभाव व्यवस्थित न मिळाल्याने उद्भवलेली परिस्थिती.
ओल्या भिंती (फ्रेम फायर स्टुडिओ)
आई आणि व मुलीच्या नाते संबंधावर नाटक. मुलीला वाटे आईने स्वतःच आयुष्य जगावं त्यासाठी केला प्रयत्न.
राकस (कलासक्त मुंबई)
दोन जमातीमधली भांडणं. रामायणाचा आधार घेऊन. स्त्रीला तिचा मान-सन्मान मिळावा ही भावना.
मार्सिया (क्रीटीव्ह कार्टी)
आई आणि मुलीमध्ये वैचारिक मतभेद. शेवटी ट्विस्ट
गूज (FRIDAY FILMS PRODUCTION)
नातं का तोडावं याची हजार कारणं असताना, ते नातं का आणि कसं जपावं हे हळुवार आणि तरलपणे उलगडून सांगणारी ही एकांकिका म्हणजेच गूज