एकांकिकांना प्रोत्साहन देण्याकरिता, ‘रीत क्रिएशन’ व ‘रीत चॅरिटेबल ट्रस्ट’ गेल्या सहा वर्षांपासून मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करतात. व ह्या वर्षी दोन वर्षांच्या खंडानंतर रीत चॅरिटेबल ट्रस्ट पुन्हा एकदा उत्साहाने घेऊन येत आहेत ‘रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२२!’
मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे जगभरात अनेक कार्यक्रम व स्पर्धा पार पडू शकल्या नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा सुद्धा खंडित पडली. परंतु आता २ वर्षांनंतर, आणखी जल्लोषात, उत्साहात व आधी पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा पुनरागमन करतेय.
रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी यंदा ऑनलाईन स्वरूपात पार पडेल. स्पर्धेचा परीघ वाढावा व जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत भाग घ्यावा हा विचार डोक्यात ठेऊन आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे, तर आपल्या देशात जिथे जिथे मराठी एकांकिका करणारे कलाकार आहेत, त्या सगळ्या कलाकारांपर्यंत पोहोचण्याचा आयोजकांचा मानस आहे. त्याकरिता मुंबई बाहेरील ३०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून येणाऱ्या संघांना यंदा प्रथमच आयोजकांतर्फे ५००० रुपयांचे सहकार्य केले जाणार आहे. “ही स्पर्धा कलाकारांनी कलाकारांसाठी आयोजित केली असल्याने, सर्व निर्णय हे पारदर्शकपणे घेतले जातील व हा एकांकिकांचा उत्सव पुन्हा एकदा जोशात साजरा करता येईल” असा आशावाद रीत क्रिएशनने व्यक्त केला आहे.
स्पर्धेचे प्रवेश शुल्क १०००/- रुपये इतके असून ते ८७७९५९५०७७ या क्रमांकावर गूगल पे करायचे आहेत. प्रवेश अर्ज व एकांकिकांचे व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी २०२२ आहे. स्पर्धकांनी आपले व्हिडिओ [email protected] या ई-मेलवर लिंकच्या स्वरूपात शेअर करावा. त्यानंतर १० फेब्रुवारी २०२२ रोजी परीक्षकांच्या निर्णयानुसार महाअंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका जाहीर केल्या जातील. स्पर्धेचा महाअंतिम सोहळा पारंपारिक पद्धतीने नाट्यगृहात आयोजित केला जाणार असून सांघिक आणि वैयक्तिक स्वरूपाची एकूण ५०,०००/- रु पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे नियम व अटी www.reetekparampara.com या वेबसाईट वर तुम्ही पाहू शकता. व अधिक माहितीसाठी [email protected] या ई-मेल वर किंवा ८८७९५७८९८२ या क्रमांकावर अध्यक्ष कु. चैताली कालुष्टे यांच्याशी अथवा ८३६९८८३१३३ या क्रमांकावर संस्थेच्या सहकाऱ्यांशी संपर्क करू शकता.