गूढकथांचे दर्जेदार लेखन करणारे लेखक आणि नाटककार रत्नाकर मतकरी. नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य प्रकारात लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार म्हणजे रत्नाकर मतकरी. रत्नाकर मतकरींनी बालनाट्य प्रकाराची निर्मिती केली तसेच झोपडपट्टीतील बालकलाकारांना घडवले. अनेक एकांकिका, बावीस नाटकं, २३ कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, १२ लेखसंग्रह असा साहित्यांचा मोठा वारसा देऊ करणारे रत्नाकर मतकरी.
Ratnakar Karandak 2022 Competition
रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथा वाचकांना अनेक रहस्यांचा प्रवास घडवतात. अशाच रहस्यमय गूढकथेवर आधारित एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली. ओम आर्ट्स आयोजित रत्नाकर करंडक २०२२ वर्ष पहिले. या स्पर्धेची मूळ संकल्पना भूषण देसाई यांची आहे. १७ जून ते २४ जुलै या दरम्यान या स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील विविध विभागात पार पडली. सर्व विभागातून एकूण २२ एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या. अंतिम फेरी १० ते १२ ऑगस्ट दरम्यान पुण्यातील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे घेण्यात आली. स्पर्धेला श्रीमती प्रतिभा मतकरी, दिलीप प्रभावळकर यांच्या उपस्थितीने स्पर्धकांना वेगळाच उत्साह मिळाला. महाराष्ट्रभरातून येणाऱ्या अनेक स्पर्धक संस्थांनी नाटकाची बस केली होती. नाट्यगृह बाहेर बस ची रांग आणि स्पर्धकांच्या उत्साहाने पावसातील थंड वातावरण उबदार झाले. अंतिम फेरीसाठी राजन ताम्हाणे, अभिजीत गुरू, सुप्रिया विनोद हे परीक्षक होते. निकाल जाहीर करताना तिन्ही परीक्षकांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले तसेच रत्नाकर मतकरी यांची कन्या सुप्रिया यांना वडिलांच्या आठवणीत अश्रू अनावर झाले.
दिलीप प्रभावळकर प्रेक्षकांशी संवाद साधत म्हणाले “रत्नाकर मतकरी हे माझे आवडते लेखक आहेत. त्यांच्या कथा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मांडणे हे स्पर्धकांसाठी आव्हानात्मक होते. मतकरींचे साहित्य खूप मोठा खजिना आहे. आयोजक भूषण देसाई यांना शाबासकीची थाप कारण अनेकांच्या सहकार्याने ही स्पर्धा भरवली आहे. या स्पर्धेला असेच यश मिळूदे आणि पुन्हा प्रेक्षकांना मतकरींच्या साहित्याचा प्रत्यय येऊदे ही सदिच्छा.”
Ratnakar Karandak 2022 Final Result
सर्वोत्कृष्ट रंगभूषा – संजोत मयेकर (इट्स ऑल इन दी हेड)
सर्वोत्कृष्ट वेशभुषा – रुचिता शिर्के (डिमटँग डिटँग)
सर्वोत्कृष्ट पोस्टर – वारस (आराधना विश्वस्त मंडळ, सोलापूर)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- २१७ पद्मिनी धाम (स्टोरीया प्रॉडक्शन्स)
सर्वोत्कृष्ट नियोजन- रुईया नाट्यवलय
सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम – साहिल पवार, क्षितिजा वाघमारे (कोळसा)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य उत्तेजनार्थ – देवाशिष आणि निलेश (२१७ पद्मिनी धाम), नितांजन केसरकर (विहीर), स्वारंगी, ओम आणि प्रफुल (असाही एक कलावंत)
सर्वोत्कृष्ट संगीत प्रथम – अक्षय-ऋषभ (कोळसा)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – सिद्धेश नांदलस्कर (कोळसा)
उत्तेजनार्थ प्रकाशयोजना – श्याम चव्हाण (कृष्णकन्या)
Ratnakar Karandak 2022 Winners
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम – जान्हवी शेलार (लव्हबाईट)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व्दितीय – रुचिता शिर्के (डिमटँग डिटँग), साक्षी महिंद्रकर (कोळसा)
सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम – रागवेंद्र कुलकर्णी (असाही एक कलावंत)
सर्वोत्कृष्ट अभिनेता द्वितीय – निनाद जाधव (लव्हबाईट)
तसेच २२ उत्तेजनार्थ अभिनेते आणि अभिनेत्री प्रमाणपत्र देण्यात आले.
Ratnakar Karandak 2022 – Best Directors
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम – अमित पाटील आणि सिद्धेश साळवी (कोळसा)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय – विठ्ठल तळवळकर (कुडाळ)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन उत्तेजनार्थ – रुपेश अहिरे (असाही एक कलावंत)
सर्वोत्कृष्ट नाट्य रूपांतर – सिद्धेश साळवी, नचिकेत पवार (कोळसा)
Ratnakar Karandak 2022 – Best Ekankikas
सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम – कोळसा (नाट्याश्रय, मुंबई)
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय – डिमटँग डिटँग (ढ मंडळी, कुडाळ)
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय – कृष्णकन्या (अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ऐरोली)
सर्वोत्कृष्ट लक्षवेधी एकांकिका – असाही एक कलावंत (रेवन एन्टरटेन्मेंट)
—
पुण्यात झालेल्या या बहारदार स्पर्धेला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. रंगभूमी.com कडून सर्व विजेत्या टीमचे अभिनंदन आणि इतर संस्थांना शुभेच्छा.