२०१९ मध्ये श्रेयसी दुसे, पार्थ टाकळकर आणि अद्वैत कुलकर्णी ‘रंगरेज’ची स्थापना यांनी केली होती. रंगरेज हे एक मनोरंजन गृह असून विविध कलांचा सराव करणारे काही विद्यार्थी ही संस्था चालवतात. आमच्यासारख्या अधिक निर्माते आणि कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे, असे पार्थ टाकळकर यांनी रंगभूमी.com शी बोलताना सांगितले.
३ एप्रिल, २०२२ रोजी ‘रंगरेज’तर्फे एक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, जिथे फिरोदिया करंडक २०२२ मधील दोन विजेत्या एकांकिका सादर केल्या जाणार आहेत.
स्थळ: बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
वेळ: ३ एप्रिल, रात्रौ ९ वाजता
तसेच रंगरेजतर्फे सर्व प्रेक्षकांना मोफत अल्पोपहारही देण्यात येणार आहे.
प्रस्तुत कार्यक्रमात सादर होणाऱ्या एकांकिका
भूत मारीच्या
एकांकिका भूत मारीच्या ही फिरोदिया करंडक विजेता एकांकिका, प्रेक्षकांना दोन मित्रांच्या YouTubeच्या वेडा पाई एक खळखळून हसवणारा, रोमांचक आणि थरथराट प्रवास बघायला मिळतो.
Oh My Sapien!
‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’ प्रस्तुत या नाटकात, एका कंपनीची कथा आहे ज्याने ‘प्रोजेक्ट अर्थ‘ आणि ‘मनुष्यप्राणी’ घडवले. हळुहळू मानव ‘प्रोजेक्ट अर्थ’ अर्थात पृथ्वीच्या संसाधनांचा अतिवापर आणि गैरवापर करू लागला. कंपनी घसरणीच्या मार्गावर असते, तेव्हा मानवाला बोलावून काय चुकत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते.
या दोन भिन्न धाटणीच्या एकांकिका बघायच्या असतील तर पुढील क्रमांकावर संपर्क साधा.
तिकिटांसाठी संपर्क: 9049073116