आरोग्यम धनसंपदा या मालाडमधील संस्थेने आपला २०वा वर्धापन दिन साजरा २६ एप्रिल २०२२ रोजी साजरा केला. योग, व्यायाम, नृत्य, संगीत, खेळ या विविध क्षेत्रात आरोग्यम धनसंपदा संस्थेने आजपर्यंत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. २० व्या वर्धापन दिनी संस्थेने ‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच‘ची स्थापना करून रंगकर्मींसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच’तर्फे पहिला उपक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. हा उपक्रम म्हणजे रंगकर्मी प्रशिक्षण शिबीर!
रंगकर्मी प्रशिक्षण शिबीर
नाटक ही एक सांघिक कला आहे. आपण जेव्हा एखादे नाटक पाहतो आणि ते आपल्याला खूप आवडतं. तेव्हा नाटकाच्या लेखन-दिग्दर्शनासोबतच आणखी महत्त्वाच्या घटकांचा एकत्रित परिणाम आपल्यावर झालेला असतो.
नाटकाच्या प्रयोगाचा परिणाम साधण्यासाठी आवश्यक घटक
१. अभिनेता-अभिनेत्री
२. नेपथ्य
३. पार्श्वसंगीत
४. प्रकाशयोजना
५. बॅक स्टेज
नाटक यशस्वी होण्यासाठी हे सर्वच घटक खूप महत्वाचे असतात.
रंगकर्मी प्रशिक्षण शिबीर या उपक्रमाद्वारे अभिनय, प्रकाशयोजना, प्रकाशयोजना संचलन, नेपथ्य, पार्श्वसंगीत, पार्श्वसंगीत संचलन आणि रंगभूषा या रंगभूमीच्या विविध अंगांचे तंत्रशुद्ध आणि प्रात्यक्षिके देऊन शिक्षण देण्यात येईल. या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात येईल.
या शिबिराद्वारे अभिनयाबरोबरच, प्रकाशयोजना संचलन (Lights Operators), पार्श्वसंगीत संचलन (Music Operators), रंगभूषाकार या क्षेत्रामध्ये तरुणांना स्वतःचे स्थान निर्माण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती आरोग्यम धनसंपदा सांस्कृतिक कला-क्रीडा केंद्रच्या अध्यक्षा अनघा म्हात्रे यांनी केली आहे.
रंगकर्मी प्रशिक्षण शिबीर नियमावली
१. रंगकर्मी प्रशिक्षण शिबीराचा कालावधी तीन महिन्यांचा असेल.
२. हे शिबिर रविवार दिनांक ७ ऑगस्ट २०२२ ते रविवार ३० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत दर शनिवार आणि रविवार रोजी दुपारी ४ ते सायं ८ या वेळेत असेल.
३. स्थळ: हे शिबीर आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच, आरोग्यम धनसंपदा, चाचा नेहेरू मैदान, राजमनोर सोसायटीजवळ, लिबर्टी गार्डन, मालाड (पश्चिम), मुंबई ४०० ०६४, येथे आयोजित केले जाईल.
४. रंगकर्मी प्रशिक्षण शिबिराचे तीन महिन्याची एकूण प्रवेश फी ₹ ५,०००/- फक्त असेल.
५. नोंदणी केलेल्या प्रवेश अर्जामधून रंगकर्मींशी संवाद साधून केवळ अंतिम २५ रंगकर्मींची निवड करण्यात येईल.
६. अंतिम निवड झालेल्या शिबिरार्थींना प्रवेश फी भरावी लागेल.
७. प्रवेश अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करावी अथवा आरोग्यम धनसंपदा कार्यालयात उपलब्ध प्रवेश अर्ज भरून नोंदणी करावी.
८. शिबिरात शिक्षण घेतलेल्या रंगकर्मींना नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.
९. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२२ आहे.
रंगकर्मी प्रशिक्षण शिबीर प्रवेश अर्ज
रंगकर्मी प्रशिक्षण शिबीराचा प्रवेश अर्ज पुढे दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdZCdJ53nOpKG21Q0jMADyoUV8Sw0kb4je4eAeUVcjmW1iOSA/viewform
रंगकर्मी प्रशिक्षण शिबीराबद्दल याहून अधिक काहीही शंका अथवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा:
आरोग्यम धनसंपदा सांस्कृतिक कला-क्रीडा केंद्र – ०२२-२८८२६३५५
उन्मेष वीरकर – ९८२१५ ७००७६
लक्षात ठेवा! नोंदणी केलेल्या प्रवेश अर्जामधून रंगकर्मींशी संवाद साधून शिबिरासाठी केवळ अंतिम २५ रंगकर्मींची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे त्वरा करा! लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या.