अभिनयाचे कसब वाटते तितके सोपे नसते. शब्दफेक, आवाजात चढउतार, निरनिराळे एक्स्प्रेशन, कॅरेक्टर पकडणे ह्या सगळ्या कसबीत कुशल असणे गरजेचे असते. पण हे शिकवणारे फार कोणी नसते आणि बहुतेक वेळा कलाकारांना हे स्वत:हून शिकावे लागते. हीच अडचण दूर करण्यासाठी ‘सृजन – द क्रिएशन‘ — प्रसिद्ध व लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक व नाटककार राजेश देशपांडे ह्यांची दोन दिवसीय लेखन-दिग्दर्शन-अभिनयाची ‘मूलभूत मार्गदर्शन कार्यशाळा‘ घेऊन येत आहेत.
राजेश देशपांडे हे एक अतिशय मोठे नाव. त्यांनी आजपर्यंत अतिशय उत्कृष्ट नाटकांची निर्मिती केली आहे. ‘करून गेलो गाव’, ‘लग्नानंतरची गोष्ट’, ‘श्री बाई समर्थ’, ‘होते कुरूप वेडे’, ही त्यांच्या यादीमधली काही अतिशय गाजलेली नाटके. नुकतेच रंगमंचावर आलेले ‘धनंजय माने इथंच राहतात’ हे नाटक देखील राजेश देशपांडे ह्यांचीच कारिगरी.
फक्त दिग्दर्शनच नव्हे तर अगदी लिखाणात सुद्धा त्यांचा वरचा हात आहे. ते म्हणतात की उत्कृष्ट लेखन हे नाटक बघणाऱ्याला रंगमंचावर नाटक बघता बघता बऱ्याच ठिकाणी फिरवू शकते. दिग्दर्शनाच्या बारीक बारीक टिप्स, एका दिग्दर्शकाचा दृष्टिकोन, लेखनाचे बारकावे, शब्दप्रयोग, अभिनयातील बारकावे ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा ह्या दोन दिवसीय कार्यशाळेत घेतला जाईल.
Rajesh Deshpande Ratnagiri Workshop
१५ व १६ जानेवारी, २०२२ रोजी गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे ही कार्यशाळा सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडेल. नाशिक, लांजा व मुंबईतील यशस्वी कार्यशाळांनंतर प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात ह्या कार्यशाळेचा उपक्रम पार पडणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपये व इतरांसाठी १००० रुपये शुल्क आहे.
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख १२ जानेवारी आहे व प्रवेश मर्यादित आहेत. ६ वर्षांवरील सर्व मंडळी ह्या कार्यशाळेचा लाभ घेऊ शकतात. प्रवेशासाठी ८८७९६६६१६१ ह्या नंबर वर संपर्क करू शकता.