लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन कलाकारांची भेट घेता येत नसल्याने विजय कदम, गिरीश ओक असे बरेच प्रख्यात रंगकर्मी ऑनलाईन माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले. या यादीमध्ये आता अजून एका ज्येष्ठ रंगकर्मीचे नाव सामील होणार आहे. ते नाव म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे!
पुरुषोत्तम बेर्डे त्यांच्या नाटक आणि चित्रपट सृष्टीतील इतक्या वर्षांच्या अनुभव व आठवणींनी समृध्द अशी एक वाद्यसंगीतमय मैफल म्हणजेच ‘पुरुक्रमा’ घेऊन १३ जून, २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पुरुक्रमाचे यापूर्वी नाट्यगृहातही बरेच प्रयोग झाले आहेत. आता घर बसल्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ‘पुरुक्रमा’मधून पुरुषोत्तम बेर्डे यांना मिळालेली सगळी रक्कम ते नाट्य समूहाच्या निधीला देणार आहेत. पुरुषोत्तम बेर्डेंनी ट्रेलरमध्ये ‘डिजिटल प्लॅटफॉर्मवरील म्युजिकल पुरुक्रमा’ असे या कार्यक्रमाचे थोडक्यात वर्णन केलेले दिसून येते. हा कार्यक्रम तब्बल २ तासांचा असून तो आपल्याला दोन भागां(एपिसोड)मध्ये विभागून दाखवण्यात येणार आहे.
‘Netpack’ या ॲपवर १३ जून, २०२१ रोजी पुरुक्रमा हा कार्यक्रम प्रदर्शित करण्यात येणार आहे. ॲपमध्ये फक्त ९९/- शुल्क भरून प्रेक्षक कधीही हा कार्यक्रम बघू शकतात.
Netpack हे ॲप Play Store वरुन डाऊनलोड करून तुमचे पुरुक्रमाचे तिकीट लवकरात लवकर बुक करा.