कुर्ल्यातील नेहरू नगर येथील प्रबोधन प्रयोगघर! या छोट्याशा आणि टुमदार नाट्यगृहाची सध्या रंगकर्मींमध्ये खूपच चर्चेत आहे. प्रबोधन प्रयोगघर हे प्रायोगिक तसेच व्यावसायिक रंगभूमीसाठी उचलण्यात आलेलं एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. प्रायोगिक संस्थांना शक्य होईल अशा कमी दरात येथे प्रयोग सादर केले जाऊ शकतात.
एका मैदानाच्या कडेला असलेली ही बहुरंगी वास्तू बऱ्याच रंगकर्मींसाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरताना दिसत आहे. या वास्तूबद्दल इत्यंभूत माहिती मिळविण्यासाठी रंगभूमी.com च्या टीमने ही वास्तू उभारण्यात मोलाचा वाटा असलेल्या ज्येष्ठ लेखक आणि दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीचा संक्षिप्त आढावा घेणारा हा व्हिडिओ नक्की बघा.
तसेच, रंगकर्मींसाठी अजून एक खुशखबर आहे!!! प्रयोग घरात तब्बल २ महिन्यांसाठी तालमींकरिता सवलत देण्यात आली आहे.
पल्लवी फाऊंडेशन आणि व्हिजन संचालित तुमचं-आमचं, आपल्या सर्वांचं हक्काचं रंगपीठ असलेल्या ‘प्रबोधन प्रयोग घरामध्ये’ नाटक, एकांकिका वा नृत्याच्या तालमीसाठी भाडे दरामध्ये विशेष सवलत जाहीर करत आहोत. ०१ जून २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत तालमीचे भाडे तासाला केवळ रु. १०० आकारण्यात येणार आहे. ही सवलत सोमवार ते शुक्रवार या दिवसांत होणाऱ्या तालमींसाठी असेल. ‘शनिवार व रविवारी’ ही भाडे सवलत लागू नसेल. या सवलत दरामध्ये वातानुकूलित यंत्रणेचा सामावेश नाही आणि ही सवलत योजना केवळ २ महिन्यांकरीता आहे, ह्याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क:- 8898282655 (प्रसाद सावर्डेकर)
आम्ही आशा व्यक्त करतो की, नाट्यकर्मींसाठी ही खूपच दिलासा देणारी बातमी ठरणार आहे आणि जास्तीत जास्त रंगकर्मी या संधीचं सोनं करून घेतील.