कलाकार आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडणारी पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत ‘दाजीकाका गाडगीळ करंडक’ ही स्पर्धा कोविड १९ मुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या २ वर्षीय खंडानंतर पुन्हा एकदा नव्या जोमात सुरु होणार आहे. ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये पार पडते. २०१६ साली सुरु झालेल्या या स्पर्धेचे हे ५ वे वर्ष आहे.
दाजीकाका गाडगीळ करंडक
दाजीकाका गाडगीळ हे पी. एन. जी. ज्वेलर्स या प्रसिद्ध सुवर्णपेढीचे संस्थापक होते. २०१४ साली झालेल्या त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ २०१६ पासून या स्पर्धेची सुरुवात झाली. दाजीकाका गाडगीळ यांचे नातू सौरभ गाडगीळ आणि अजय नाईक यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत दरवर्षी एका केंद्रातून १०० हून अधिक संघ या स्पर्धेत भाग घेतात. या स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यात पार पडते.
दाजीकाका गाडगीळ करंडक २०२२ या स्पर्धेची प्राथमिक फेरी ६ केंद्रांमधून पार पाडण्यात येईल. पुणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद (संभाजीनगर), नागपूर आणि कोल्हापूर या केंद्रांवर १२ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर, २०२२ या दिवसांमध्ये प्राथमिक फेरी पार पडेल. अंतिम फेरी २४ आणि २५ सप्टेंबर २०२२ रोजी, पुण्यात पार पडेल.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज १ ऑगस्ट २०२२ पासून उपलब्ध होतील.
स्पर्धेचे प्रवेश शुल्क — १०००/-
अर्ज भरण्याची अंतिम तारीख — ३० ऑगस्ट
पारितोषिके
दाजीकाका गाडगीळ करंडक २०२२ च्या विजेत्यांना भरगोस रोख बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.
प्रथम पारितोषिक — १,००,००० /-
द्वितीय पारितोषिक — ७५,००० /-
तृतीय पारितोषिक — ५१,००० /-
उत्तेजनार्थ (२ संघ) — १०,००० /-
त्याचबरोबर विजेत्या संघास मानाचा फिरता ‘दाजीकाका गाडगीळ करंडक’ प्रदान केला जाईल. दिग्दर्शन, अभिनय (स्त्री, पुरुष), प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत आणि लेखन यासाठीदेखील प्रथम, द्वितीय, तृतीय अशी स्वतंत्र रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच प्राथमिक फेरीसाठीदेखील भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तेव्हा सर्व नाट्यसंघांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व दाजीकाका गाडगीळ करंडक २०२२ मध्ये आवर्जून सहभाग घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क
श्रेयस — ९८६०३६५३५८, रोशन — ९५९५२५१७१७