आम्ही काही दिवसांपूर्वी कणकवली आणि कोल्हापूर येथे सादर होणाऱ्या परिवर्तन कला महोत्सवाबद्दल तुम्हाला इत्यंभूत माहिती दिली होती.
कणकवलीत रंगणार तीन दिवसीय परिवर्तन कला महोत्सव!
कणकवलीनंतर आता कोल्हापूरात रंगणार तीन दिवसीय परिवर्तन कला महोत्सव!
या तीन दिवसीय महोत्सवाला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे पुन्हा एकदा आता मुंबईतही हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
स्थळ: पु. ल. देशपांडे सभागृह — पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, दादर
प्रवेश सर्वांसाठी खुला!
परिवर्तन कला महोत्सव वेळापत्रक
दि. १३ मे रोजी, रात्रौ ८ वाजता महोत्सवाची सुरुवात बहिणाईंच्या कविता व गाण्यांवर आधारित अरे संसार संसार या सुरेल मैफिलीने होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना विजय जैन यांची असून दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे आहे. परिवर्तनचे कलावंत या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत.
दि. १४ मे रोजी, रात्रौ ८ वाजता श्रीकांत देशमुख लिखित, शंभु पाटील नाट्यरुपांतरीत व योगेश पाटील दिग्दर्शित नली हे एकलनाटय सादर होणार आहे व या एका निरपेक्ष प्रेम कहाणीचे सादरीकरण हर्षल पाटील करणार आहेत.
दि. १५ मे रोजी, सायंकाळी ४ वाजता शंभु पाटील लिखित व मंजुषा भिडे दिग्दर्शित अमृता साहिर इमरोज हे नाटक सादर होणार आहे व या नाटकाचे सादरीकरण परिवर्तनचे कलावंत पार पाडणार आहेत.
कणकवली आणि कोल्हापूरनंतर मुंबईमध्ये सादर होणाऱ्या परिवर्तन कला महोत्सवालाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल याबद्दल वाद नाही.