महाराष्ट्र दिन साजरा होत असताना त्याच उत्साहात, महाराष्ट्राच्या कलागुणांना वाव देण्यासाठी NCPA प्रस्तुत “प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव” आयोजित केला गेलेला आहे. १९६९ पासून NCPA कार्यरत आहे. गेली १० वर्षे NCPA “प्रतिबिंब” हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. नाटक, संगीत, नृत्य, फोटोग्राफी आणि अशा बऱ्याच कलांचे ते माहेरघर ठरले आहे. आजही तिथे जागतिक आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव मोठ्या प्रमाणावर होत असतात.
५, ६ आणि ७ मे रोजी होणाऱ्या या तीन दिवसीय उपक्रमात आपल्याला सुप्रसिद्ध, आणि विजेती नाटकं बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर, National Centre Of Performing Arts Theatre, आर्ट गॅलरी, आणि लायब्ररीची सहल करायला मिळणार आहे. हे तीन दिवस नाटक या विषयावर असंख्य गप्पा, वाचन आणि मराठी कलाकारांमार्फत अभिनय, आवाज आणि सादरीकरण या विषयांवरील कार्यशाळासुद्धा आयोजित केल्या गेल्या आहेत.
खुशरू एन. संतूक, NCPA चे अध्यक्ष सांगतात, “सुरुवातीपासूनच, NCPA हे मराठी नाटकांसाठी आणि प्रोजेक्ट्ससाठी एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे. मराठी रंगभूमी व लेखकांसाठी NCPA ने घेतलेला पुढाकार म्हणजेच ‘दर्पण’. यात मराठी नाट्यलेखकांना आपली कथा प्रतिबिंब मराठी नाट्यउत्सवात सादर करण्याची संधी मिळणार आहे. ‘कलगीतुरा’ (Kalgitura), दर्पणमध्ये जिंकलेल्या ह्या नाटकाचा प्रीमियर येथे लाँच होणार आहे. ७०० वर्षे जूनी लोकपरंपरा कशी वाचवण्यात आली, यावर ही कथा आहे. आपल्या संस्कृतीची जपणूक, हा विषय आपल्या अगदी जवळचा असल्याकारणाने, या नाटकाशिवाय दुसरे नाटक आपल्या उपक्रमाची सुरुवात करूच शकत नाही, यावर विश्वास बसला.”
नाटकं जरी मराठीतून असली, तरी त्यांना English Subtitles देण्यात आलेली आहेत (सैनिक आणि प्रिय भाई व्यतिरिक्त). जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपक्रम पोहचला पाहिजे हीच आशा.
ब्रूस गथरी (नाट्य व चित्रपट विभागाचे प्रमुख) म्हणतात, “नाटकांसाठी लिहिलेली कथा आणि ते रंगमंचावर आणण्यासाठी केलेली मेहनत याला शाबासकी मिळालीच पाहिजे.”
कार्यक्रमात सादर केली जाणारी नाटके आणि कार्यशाळा वेळापत्रक
५ मे, २०२३ (शुक्रवार)
१. “कलगीतुरा” — संगीत नाटक — 7pm
लेखक: दत्ता पाटील
कालावधी: १२० मि.
भाषा: मराठी
ठिकाण: Experimental Theatre: NCPA
परसुल, महाराष्ट्र या गावातील “कलगीतुरा” ही ७०० वर्ष जुनी परंपरा अचानक लोप पावू लागली, व असं होऊ नये म्हणून गावातीलच एका समूहाने आपली परंपरा सुरू ठेवण्यासाठी काय प्रयत्न केले. कलगी (शक्ती) आणि तुरा (शिव) हा सुंदर अर्थ लक्षात ठेवत च, कलाकारांनी हे विजेतं नाटक स्टेज वर रंगवलं आहे.
६ मे, २०२३ (शनिवार)
१. Voice, Speech & Diction (आवाज परिवर्तन कार्यशाळा) — 11am to 2:30pm
ठिकाण: Sea View Room, NCPA
शुल्क: ५००/-
अक्षय शिंपी, १० वर्ष थिएटर करून, ३०+नाटकं आणि शॉर्टफिल्म असा अनुभव पाठीशी असताना. आपला आवाज आपण कसा सांभाळावा आणि स्टेज वर तो कसा वापरावा, आवाजासाठी exercises कोणत्या कराव्यात अशी सगळी प्राथमिक माहिती देऊन शिकवणार आहेत.
२. Guided Tour of the NCPA Theatres and Library — 3 pm
मोफत प्रवेश (Email: [email protected])
ठिकाण: Assembly point – Sunken Gardens
३. प्रस्थान उर्फ exit (राखाडी स्टुडिओ) – मराठी नाटक — 4pm
ठिकाण: Experimental Theatre: NCPA
कालावधी: १०० मिनिटे
अलोक राजवाडे दिग्दर्शित हे नाटक एका ८० वर्षीय जोडप्यावर आहे. तेवढंच सिरीयस पण तेवढंच कॉमेडी, हे नाटक 3 पुरस्कार प्राप्त आहे.
४. उच्छाद (राखाडी स्टुडिओ) — मराठी नाटक — 7:30pm
दिग्दर्शन: अनुपम बर्वे
कालावधी: ८० मिनिटे
ठिकाण: Experimental Theatre: NCPA
फ्रेंच नाटकाचे हे मराठी रुपांतर आहे. एक अतिशय वेगळा विषय, वेगळ्या पद्धतीने हाताळला आहे. २३ शो पूर्ण करून हे नाटक वेगवेगळ्या शहरात आपला वेगळा विषय मांडते आहे.
७ मे, २०२३ (रविवार)
१. नाट्यदिशा — थिएटर वर्कशॉप — 11am to 2:30pm
ठिकाण: Sea View Room
शुल्क: ५००/-
दिग्दर्शक आणि अभिनेता अभिजित झुंझारराव, स्वतः ही का तुझ्याकडेर्यशाळा आयोजित करत आहेत. आणि आपला अनुभव आणि शिक्षण ह्या बळावर ते Acting, Set designing, light, makeup, music & theatre management, voice modulation, body movement, मराठी थिएटर बद्दल माहिती
२. प्रिय भाई, एक कविता हवी आहे – संगीत नाटक – 3pm
कालावधी: १०५ मिनिटे
ठिकाण: Experimental Theatre: NCPA
मेडिकलच्या विद्यार्थ्यांना एक कल्पना सुचते, ती म्हणजे स्वातंत्र्य आणि कविता यांचा मेळ. या करता त्यांना सुचते ती कविता म्हणजे, रवींद्रनाथ टागोरांची “where the mind is without fear”, पण ती बंगालीतच हवी. तेव्हा त्यातला एक विद्यार्थी पु. ल. देशपांडे व त्यांच्या बायकोला भेटतो व त्यांना हा विचार ऐकवतो. या सुंदर कल्पनेने भारावलेले ते दोघं, त्यांना अनेक कविता ऐकवतात, ज्या त्यांना स्वतः भावलेल्या आहेत. तसेच, कविता व त्यांचे महत्त्व देखील समजून सांगतात. हे संगीत नाटक, म्हणजे कवितांचा साठा आहे. नक्की नक्की पहा.
३. सैनिक (प्रीमियर शो) – एकपात्री प्रयोग – 5pm
कालावधी: ७५ मिनिटे
ठिकाण: Godrej Dance Theatre:NCPA
सैनिक एका युद्धात कामगिरी बजावतो आणि तोही त्या युद्धात कामी येतो. का? यातून झालं काय? तर सैनिकाचे मरण. मग हे बलिदान की मर्डर? हा एक पत्र प्रयोग मकरंद देशपांडे लिखित असून, दिग्दर्शन आणि अभिनय सुद्धा त्यांनीच केला आहे.
*प्रयोग झाल्यानंतर चर्चा – सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
४. चारचौघी – मराठी नाटक — 7pm
कालावधी: १९५ मिनिटे
ठिकाण: Tata Theatre: NCPA
त्या चौघींचा प्रवास, जो पितृसत्ताक समाजाची बंधने झटकून टाकणारा आहे. १९९० – २००० या दहा वर्षात १००० शोज चा विक्रम करणारं हे नाटक आता परत नव्या रुपात आला आहे. आणि त्याला जोरदार असा प्रतिसाद पण मिळत आहे.
मराठी नाट्यरसिकांसाठी “प्रतिबिंब” ही एक पर्वणीच असणार आहे, आणि याला जास्तीत जास्त प्रतिसाद हा तरुण पिढीकडून अपेक्षित आहे. तर तुम्हाला ‘थिएटर’ची आवड असेल, तर जरूर या संधीचा लाभ घ्या आणि अविस्मरणीय असे अनुभव घेऊनच बाहेर पडा. प्रतिबिंब या नावाप्रमाणेच आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींची जाणीव आपल्याला करून देणारी ही नाटकं आहेत.