कोविड १९ मुळे देशभरात लॉकडाऊनचे निर्बंध लागू झाल्यानंतर आता नाट्यगृहे पुन्हा उघडली आहेत आणि नाटकांचे प्रयोग प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडत आहेत. लॉकडाऊनमुळे बंद झालेली बरीच नाटकं रंगभूमीवर पुन्हा पदार्पण करत आहेत. ‘नाट्यवाडा‘ निर्मित ‘पाझर‘ हे लॉकडाऊनपूर्वी पुरस्कारांची शंभरी पार केलेलं एक तुफान विनोदी नाटकसुद्धा पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण करत आहे. येत्या १७ जुलै रोजी या नाटकाचा लॉकडाऊननंतरचा पहिला प्रयोग मुंबईमध्ये सादर होणार आहे.
Paazar Storyline
पाझर कथानक
प्रवीण पाटेकर लिखित व दिग्दर्शित ‘पाझर’ हे दोन अंकी मराठी नाटक आहे. पाझर ह्या नाटकातील कथानक मराठवाड्यातील एका गावात घडतं. पाण्याचा प्रश्न ज्यांच्यासमोर न सांगता सतत उपस्थित असतो अशा एका गावात ७२ सालच्या दुष्काळानंतर एक भयंकर दुष्काळ पडतो. पाण्याच्या अभावामुळे पशू, पक्षी, प्राणी, मानव ह्यांचे हळूहळू बळी जात आहेत. दुसरीकडे नव्याने आलेल्या औद्योगिकीकरणाचं वारंसुद्धा शहरांमध्ये तुफान वेगात पसरू लागल्यामुळे हळूहळू गावातली लोकं गाव सोडून शहराच्या वाटेनं जाऊ लागली आहेत. अशा सगळ्या निराश वातावरणात गावातलं जुनं खोड, म्हणजे म्हातारा जिजा काही जणांना एक युक्ती सुचवतो. ही युक्ती नेमकी काय असते? युक्ती अपयशी ठरते की त्यांच्या गावात पुन्हा पाण्याचा बहर येतो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे नाटक नाट्यगृहात जाऊन पहावं लागेल.
ही कथा आहे काही गावकऱ्यांच्या उमेदीची आणि सर्वांच्या जीवनाच्या मूलभूत गरजेची… पाण्याचा अभाव एका गावात किती बदल आणू शकतो ह्याचं स्पष्ट चित्र आपल्याला या नाटकातून दिसतं. पण या वाटणाऱ्या गंभीर विषयाचे हे नाटक एक विनोदी सादरीकरण आहे. त्यामुळे विचार करायला लावताना हे नाटक आपल्याला हसवणार हे निश्चित!
Cast & Crew
पाझर नाटकाची संपूर्ण टीम
लेखक / दिग्दर्शक — प्रवीण पाटेकर
कलावंत — शुभम खरे, प्रशांत गीते, संतोष पैठणे, प्रथमेश जाधव, आकाश थोरात, सचिन पंडीत, सुनील सरकटे, पल्लवी कुलकर्णी, शिवांजाली सापे
प्रकाशयोजना — प्रवीण पाटेकर
गीत — प्रवीण पाटेकर
संगीत संयोजन — भूषण ढोबळे
नेपथ्य — सुनील वनवे
रंगभूषा — पल्लवी कुलकर्णी
वेशभूषा — ऋषिकेश रत्नपारखी
१७ जुलै २०२२ रोजी, रात्री ८ वाजता, प्रबोधनकार ठाकरे मिनी नाट्यगृह, बोरिवली, येथे लॉकडाऊननंतर प्रथमच या नाटकाचा प्रयोग पार पडणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनी पाझर या नाटकाला भरघोस प्रतिसाद द्यावा.
तिकिटांसाठी संपर्क : – ७४९९२१६४१७, ७७१९०८०४७१
Awards
आजवर मिळलेले पुरस्कार
सवाई करंडक, मुंबई (२०१७)
सांघिक प्रथम पारितोषिक, संगीत प्रथम, प्रकाषयोजना प्रथम, लेखन प्रथम
पुषोत्तम करंडक, पुणे (२०१६)
सांघिक प्रथम पारितोषिक, दिगदर्शक प्रथम, अभिनय प्रथम, संगीत प्रथम, प्रकाशयोजना प्रथम, लेखन प्रथम
मिरज करंडक (२०१६)
सांघिक प्रथम पारितोषिक, अभिनय प्रथम, प्रथम अभिनय बाल कलाकार, संगीत प्रथम, प्रकाशयोजना प्रथम, लेखन दिगदर्शन प्रथम
सूर्यकांता करंडक, धुळे (२०१६)
सांघिक प्रथम, लेखन प्रथम, दिगदर्शक प्रथम, अभिनय प्रथम, संगीत प्रथम, प्रकाशयोजना प्रथम
कालिदास करंडक (२०१६)
सांघिक प्रथम पारितोषिक, दिगदर्शक प्रथम, अभिनय प्रथम, संगीत प्रथम, प्रकाशयोजना प्रथम, लेखन प्रथम
दाजीकाका करंडक, पुणे (२०१६)
सांघिक प्रथम, लेखन प्रथम, दिगदर्शक प्रथम, अभिनय द्वितीय, संगीत द्वितीय, प्रकाश द्वितीय
बोलीभाषा करंडक ,मुंबई (२०१६)
सांघिक प्रथम पारितोषिक, दिगदर्शक प्रथम, अभिनय प्रथम द्वितीय, संगीत प्रथम, प्रकाशयोजना प्रथम, लेखन प्रथम
कलश करंडक ,मुंबई (२०१६)
सांघिक प्रथम पारितोषिक, दिगदर्शक प्रथम, अभिनय प्रथम, संगीत प्रथम, प्रकाशयोजना प्रथम, लेखन प्रथम
प्रकाश देसाई सामाजिक सांस्कृतिक प्रतिशस्थान पाली करंडक रायगड (२०१६)
सांघिक प्रथम, दिग्दर्शन प्रथम, संगीत दुसरा क्रमांक, अभिनय तृतीय
शाहूमोडक करंडक अ नगर सांघिक प्रथम पारितोषिक (२०१६)
सांघिक अभिनय प्रथम, संगीत प्रथम, प्रकाशयोजना प्रथम, लेखन
द्वितीय पारितोषिके
लोकसत्ता लोकांकिक मुंबई सांघिक द्वितीय (२०१६)
लोकसत्ता अभिनेता
मदनभाऊ करंडक, सांगली
सांघिक द्वितीय (२०१६), दिग्दर्शन तृतीय, अभिनय प्रमाणपत्र
सुशील करंडक, सोलापुर सांघिक द्वितीय (२०१६)
दिग्दर्शन द्वितीय
शाहु करंडक,जयसिंगपुर सांघिक द्वितीय (२०१६)
लेखन/दिग्दर्शन द्वितीय, संगीत तृतीय, प्रकाश योजना तृतीय
रायगड करंडक, मानगाव सांघिक द्वितीय (२०१६)
अभिनय तृतीय
सांघिक तृतीय परितोषके
बार्शी सांघिक तृतीय क्रमांक (२०१५)
संगीत तृतीय, लेखन/दिग्दर्शन तृतीय
इचलकरंजी सांघिक तृतीय क्रमांक (२०१६)
आवाज करंडक मुंबई सांघिक तृतीय क्रमांक (२०१६)
दिग्दर्शन तृतीय, लेखन तृतीय
उंबरठा मुंबई सांघिक तृतीय (२०१६)
दिग्दर्शन तृतीय, लेखन तृतीय, अभिनय तृतीय
चतुर्थ क्रमांकाची पारितोषिके
अहमदनगर महाकरंडक-चतुर्थ क्रमांक (२०१६)
लेखन द्वितीय, दिग्दर्शन द्वितीय, अभिनय उत्तेजनार्थ
खास पारितोषिके
अक्षर करंडक नगर सर्वोत्कृष्ट ग्रामीण संघ (२०१५)
नाशिक करंडक स्पेसिएल जुरी अवॉर्ड (२०१६)
वाचिक अभिनय प्रथम
महापौर चषक नागपूर सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका (२०१६)
बाळ कलाकार अभिनय प्रथम
या पलीकडे अंतरमहविद्यालियीन स्पर्धा,विद्यापीठ अंतर्गत स्पर्धा ,अश्या अनेक ठिकाणी सांघिक वयक्तिक पारितोषिक या पाझर या नाटकाला मिळाली आहेत.