नाशिककरांसाठी एक खास मेजवानी आहे. एक मनोरंजक नाटक नाशिककरांच्या भेटीस येत आहे. ‘प्रेम करावं पण जपून’ या नाटकाचा एक खास प्रयोग २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे सादर होणार आहे.
आनंदाची बातमी म्हणजे या नाटकाची तिकिटं तुम्हाला रंगभूमी.com वेबसाईटवर बुक करता येणार आहेत.
Book Tickets — ‘प्रेम करावं पण जपून’ नाशिक प्रयोग
पुढील लिंकवर क्लिक करा आणि आजच या नाटकाची तिकिटे बुक करा.
‘प्रेम करावं पण जपून’ नाटक सारांश
आजपर्यंत प्रेमाची कथा सांगणारी किंवा प्रेमावर भाष्य करणारी बरीच नाटकं येऊन गेली आहेत. पण प्रेमाकडे एका वेगळ्या नजरेने बघणारं आणि आजकालच्या जगातल्या प्रेमसंबंधांबद्दल आपले डोळे उघडणारं एक नवीन नाटक सध्या रंगभूमी वर आलंय. मधुसंगिता थिएटर्स आणि अर्चना थिएटर प्रस्तुत प्रेम करावं पण जपून हे नव्यापिढीच्या प्रेमाबद्दलच्या विचारांवर आणि प्रेमाच्या विविध छटांवर हसत-खेळत रंग टाकणारं एक नवीन विनोदी नाटक. नाटकाची कथा आणि कलाकार हे अगदी नवोदित असूनही नाटक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतं. नाटकात असलेल्या मालवणी ठसक्यामुळे प्रेक्षकांची भरभरून करमणूक होते हे अगदी निश्चित.
‘प्रेम करावं पण जपून’ नाटक रिव्ह्यू
नाटकाचा संपूर्ण रिव्ह्यू वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
‘प्रेम करावं पण जपून’ Natak Review