लॉकडाऊनपश्चात, रंगभूमी.com च्या माध्यमातून आम्ही नाटकांची समीक्षणे, प्रयोगांचे वेळापत्रक, कलाकारांच्या मुलाखती, नाटकांबद्दल संपूर्ण माहिती आणि नाटकांशी संबंधित बरंच काही तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. रंगभूमी.com आणि प्रेक्षकांमधील प्रवास अखंड सुरू राहावा हाच आमचा मानस आहे. कुठलं नाटक कुठल्या नाट्यगृहात किती वाजता बघता येईल याची माहिती आम्ही देतच होतो आणि आता तमाम रसिक प्रेक्षकांच्या विनंतीचा मान ठेवत आम्ही तुमच्या आमच्या रंगभूमी.com वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुकींग सुरू करत आहोत. रंगभूमी.com ने हे नवं पाऊल खास तुमच्या सोयीसाठी उचललं आहे आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही या ऑनलाईन सोयीचा पुरेपूर लाभ घ्याल. सध्या आमच्यासोबत मर्यादित नाटकं तिकीट विक्री साठी जोडली गेली असली तरी या सगळ्या नाटकांतून १००% मनोरंजनाची हमी आम्ही देऊ शकतो आणि पुढील प्रवासात तुमची साथ राहिली तर ही यादी अर्थातच वृद्धिंगत होत राहील.
ऑनलाईन तिकीट बुकिंग लिंक (Book Natak Tickets Online)
प्रेक्षकांसाठी खास वैशिष्ट्ये
१. तुम्ही वरील लिंकला भेट दिली असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही तिकीट बुकिंग प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुटसुटीत ठेवली आहे.
२. तरीही या प्रक्रियेत जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर ९९९ २५६ २५६ १ या क्रमांकावर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आम्ही तुमच्यासाठी तिकीट बुक करू.
३. नाटकाच्या तिकिटांसोबत त्या नाटकाची पुरेपूर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहील.
४. पूर्ण प्रक्रियेत तुम्हाला रंगभूमी.com तर्फे support देण्यात येईल.
५. आम्ही इतर ऑनलाईन बुकींग प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत अत्यंत अल्प दरात बुकींग फी आकारात आहोत, याची विशेष नोंद घ्यावी.
६. रंगभूमी.com ही एक नाट्य चळवळ आहे. तुम्ही रंगभूमी.com कडे ऑनलाईन तिकीट बुक करणे म्हणजे आमच्या आजवरच्या प्रयत्नांना मिळालेली दाद असेल.
नाट्यसंस्थांसाठी खास वैशिष्ट्ये
१. आमच्या या बुकींग प्रक्रियेत सर्व प्रकारच्या नाट्यानुभवांचे स्वागत आहे. नाटक, दीर्घांक, एकांकिका, नाट्यमहोत्सव, स्पर्धा अशा सर्व कार्यक्रमांची तिकिटे आम्ही विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ.
२. मुंबई व पुण्यासह महाराष्ट्रातील इतर बऱ्याच शहर व गावोगावच्या नाट्यगृहांचे Seating Charts आमच्याकडे उपलब्ध आहेत.
३. ऑनलाईन बुकींगसोबतच फोनवर Box Office पद्धतीनेही तिकीट बुकींग स्वीकारू.
४. प्रयोगानंतर काहीच दिवसात तुम्हाला जमा झालेली तिकिटांकची रक्कम सुपूर्द करण्यात येईल.
५. तुमच्या नाटकाबद्दल माहिती, लेख तसेच काही Promotional Content आमच्या सोशल प्लॅटफॉर्म्सवर प्रकाशित केला जाईल.
पहिल्या टप्प्यात आमच्याशी जोडली गेलेली नाटकं
आमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून पहिल्याच टप्प्यात आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या पुढील नाट्यसंस्थांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत. www.rangabhoomi.com/tickets/ या लिंकवर जाऊन तुम्ही आवडत्या नाटकाची तिकिटे बुक करू शकता!
हीच तर फॅमिलीची गंमत आहे • Online Ticket Booking
सुपर डुपर कॉमेडी नाटकाचा नजराणा! समोरासमोर राहणाऱ्या दोन कुटुंबामधील प्रत्येक सदस्यामध्ये काही ना काही शारिरीक व्यंग (defect) असतात. अशातच, त्या कुटुंबांमध्ये कशाप्रकारे सोयरिक जुळून येते आणि ती जुळून येताना काय धमाल उडते हे बघण्यासाठी तुम्हाला या नाटकाला भेट द्यावी लागणार आहे. वेद प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकात शलाका पवार, सागर कारंडे यांच्यासोबत सायली देशमुख, सिद्धीरूपा करमरकर, अजिंक्य दाते, अमोघ चंदन, रमेश वाणी हे गुणी कलाकारही आहेत.
गोपाळ अलगेरी व सुनीता अहिरे यांची निर्मिती असलेल्या या नाटकाला अशोक पत्की यांचे संगीत लाभलेले असून गीतकार मिलिंद जोशी आहेत. नाटकाचे सूत्रधार गोट्या सावंत आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. तर वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे. एकंदरीतच काय? तर, अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि तांत्रिक अशा सर्वच बाजू सशक्त असलेलं हे विनोदी नाटक आपलं पोटभर मनोरंजन करणार आहे यात तिळमात्र शंका नाही.
पुढील लिंकवर क्लिक करून तिकीट बुक करा.
Buy tickets for Hich Tar Family Chi Gammat Aahe Marathi Natak
अंधे जहाँ के अंधे रास्ते • Book Natak Tickets Online
हे नाटक एका सत्य घटनेवर आधारित आहे. या नाटकात मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांच्या घरात, परिवारात व वैवाहिक जीवनात काय अडचणी येतात याचं अगदी स्पष्ट चित्र आपल्यासमोर मांडलं आहे. त्यांना पुरेसा पगार मिळत नाही व जितके पैसे मिळतात ते कधीही वेळेवर मिळत नाहीत. एवढंच काय त्यांना पुरेशी आरोग्यसेवादेखील मिळत नाही. त्यांच्या जातीमुळे व त्यांच्या शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना आयुष्यभर या गरिबीत जगावं लागतं. किंबहुना त्यांना गरिबीत जगवलं जातं, कारण त्यांनी जर हे काम केलं नाही तर मुंबई घाणीने तुंबून जाईल. त्यामुळे त्यांच्या पिढ्यानपिढ्या हीच घाण उपसत आल्या आहेत. मॅनहोलमधून येणाऱ्या त्या असह्य वासाला वैतागून हे कर्मचारी नशेच्या आहारी जातात. मॅनहोलमध्ये उतरताना त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिली जात नाही. हे कंत्राटी कामगार असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुखसोयीदेखील त्यांना मिळत नाही. सरकार त्यांच्या या परिस्थितीची जबाबदारी कधी घेणार? अजून किती पिढ्या ही माणसं हेच काम करत राहणार? आणि त्यांच्या या समस्येचं निवारण आहे की नाही? असे बरेच प्रश्न विचारणारं हे नाटक आहे.
पुढील लिंकवर क्लिक करून तिकीट बुक करा.
Book tickets for Andhe Jahaan Ke Andhe Raaste Marathi Natak
Googleefy • Ticket Booking for Marathi Natak
एकविसाव्या शतकाने जशी technology माणसाच्या दारात आणली तशी आपल्या नकळत सगळ्यांच्या घरात एक नवीन सदस्य वास्तव्याला आला. Google! आणि आपण अजाणते असल्याचा आव आणत त्याच्याशी मैत्री वाढवत राहिलो. आज आपल्याला आपल्यापेक्षा जास्त तो ओळखतो. एक trip to goa असं search केलं की आपसूक चार गोव्यातल्या हॉटेलच्या advertise समोर येतात. आपल्या मनात जे गाणं आहे तेच search मध्ये खाली येतं. आणि त्याचं असं हे आपल्याला ओळखणं आपल्याला भावतं. पण पूर्वी कधीतरी phone number पाठ करणारी माणसं आज लोकांचे माहिती असलेले पत्ते सुद्धा लक्षात न ठेवता map वर टाकतात. ह्याचं अंतिम साध्य काय असेल तर कधीतरी माणूस डोक्याचा वापर करणं कमी करून टाकेल आणि संपूर्णपणे google वर विसंबून जाईल. अशीच परिस्थिती आल्यानंतर घडलेली ही गोष्ट आहे.
पुढील लिंकवर क्लिक करून तिकीट बुक करा.
Buy tickets for Googleefy Marathi Natak
येत्या काही दिवसात इतरही नाटकांची तिकिटे रंगभूमी.com वर उपलब्ध होणार आहेत. आम्हाला आशा आहे की तुमची साथ आम्हाला अशीच मिळत राहील. जेणेकरून, बऱ्याच नाट्यसंस्था नजीकच्या काळात आमच्याशी जोडल्या जातील. आमचं हे ऑनलाईन तिकीटघर तुम्हाला आवडेल अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करतो. तसेच, तुमच्या अभिप्रायाची आम्ही वाट बघत आहोत. आमचा हा नवा उपक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.