कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या COVID–19 या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी कोरोनापासून जनतेचा बचाव करण्यासाठी Lockdown चा ऐलान केला आहे. जनतेचे या संदर्भातील विचार जाणून घेण्यासाठी प्रयोग मालाड संस्था खालील online स्पर्धांचे आयोजन करीत आहे.
१. निबंध (लेख) लेखन स्पर्धा
→ विषय — कोरोना चा सामाजिक संदेश आणि देश व व्यक्ती स्तरावरील आर्थिक व्यवहारांवर होणारा परिणाम
२. छायाचित्र स्पर्धा
→ विषय — कोरोना हॉलिडे काळातील स्तब्ध मुंबईतील सार्वजनिक व नैसर्गिक विहंगम दृश्ये
३. पोस्टर बनवणे स्पर्धा
→ विषय — कोरोना युद्ध काळातील अपेक्षित मानसिकता
या स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुल्या असतील. तुम्ही एक वा एकाहून जास्त स्पर्धेत सहभागी होऊ शकता. प्रत्येक स्पर्धेचे प्रवेश शुल्क १००/- आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची प्रक्रियाही अतिशय सोपी असून स्पर्धकांसाठी घर बसल्या भरपूर आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. स्पर्धेसाठी प्रवेशाची अंतिम तारीख २५-०४-२०२० आहे. त्यामुळे जराही वेळ ना दवडता लवकरात लवकर या स्पर्धेत सहभागी व्हा!
स्पर्धेचे नियम व अटी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
तसेच, प्रवेशाचा अर्ज दाखल करण्यासाठी येथे क्लिक करा.
याव्यतिरिक्त अधिक शंका अथवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधा. प्रदिप देवरुखकर – ९९२०७५९६५९