storyयाँ production, its all about Kalyan आणि स्वामी नाट्यांगण या तीन संस्थांनी एकत्र येऊन १५ ऑगस्ट, २०२० रोजी भारतात तसेच जर्मनीमध्ये दोन online नाट्याविष्कार सादर करायचे ठरविले आहे. “लकीर” आणि “बिफोर द लाईन” या दोन एकांकिका या कार्यक्रमात दाखविल्या जातील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोन्ही एकांकिकांची तयारी लॉकडाउनच्या काळात करण्यात आली आहे. या एकांकिकांचे लाईव्ह प्रक्षेपण होणार नाहीये तर त्या शूट करून प्रेक्षकांना दाखवण्यात येणार आहेत याची कृपया प्रेक्षकांनी नोंद घ्यावी.
तिकीट शुल्क फक्त ५०/- भरून तुम्हाला दोन्ही एकांकिका बघता येतील. दोन्ही एकांकिकांचे ३ प्रयोग उद्या एकाच दिवसात असतील. सकाळी ११ वाजता, दुपारी ४ वाजता आणि सायंकाळी ७:३० वाजता. तुम्ही कोणत्याही प्रयोगासाठी राहुल खरेशी ८६५२४५९९२३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून बुकिंग करू शकता. तसेच जर्मनीमधील प्रेक्षकांसाठी १५ ऑगस्ट रोजी रात्री ८:३० वाजता एक Online प्रयोग ठेवण्यात आला आहे.
प्रयोगासाठी बुकिंग केल्यावर तुम्हाला Zoom App ची लिंक देण्यात येईल. ज्या लिंकचा वापर करून तुम्ही प्रयोग बघू शकता.
आम्ही आशा व्यक्त करतो की तुम्हाला या दोन्ही एकांकिका नक्की आवडतील. तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.