अजेय संस्था ठाण्यात गेली नऊ वर्ष झपूर्झा नाट्यचळवळ सादर करत आली आहे. यंदाचे झपूर्झा चे १० वे वर्ष. झपूर्झा दशक महोत्सव वर्ष आहे, एका थीमवर आधारित नृत्य व नाट्यविष्कार झपूर्झा मध्ये सादर होतात. स्पर्धात्मक वातावरणा बाहेर कलाकारांना त्यांची कला सादर करता यावी, त्याचा आनंद कलाकारांना व प्रेक्षकांना मिळवा आणि या संपूर्ण प्रक्रियेतून नवोदित कलाकारांना कला सादरीकरणा संदर्भात अनेक नवीन गोष्टी शिकता याव्यात ही झपूर्झा ची मूळ संकल्पना. झपूर्झा नाट्य चळवळी ची संकल्पना लेखक, दिग्दर्शक डॉ.क्षितिज कुलकर्णी यांची असूनअध्यक्ष गौरव संभूस आहेत अजेय टीम आयोजन, व्यवस्थापन व प्रोडक्शन बघत आली आहे.
झपूर्झा यावर्षी १०व्या वर्षात पदार्पण करत आहे. या घटनेचं विशेष महत्त्व झपूर्झाला प्राप्त झालं आहे. या विशेष महत्वाला अनुसरून झपूर्झा दशक महोत्सव तीन टप्प्यांमध्ये साजरा होतोय. पहिला टप्पा ‘काव्ययोग’ ३ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ पासून मराठी ग्रंथ संग्रहालय स्टेशन रोड येथे होत आहे.
ठाण्यातील सुप्रसिद्ध जेष्ठ कवी कै. म.पा.भावे ह्यांचा स्मृती प्रीत्यर्थ अजेय संस्था म.पां. भावे नावे काव्य पुरस्कार सुरू करत आहे. ह्याच सोहळ्याचं विशेष मराठी कवितेमधील गेल्या दशकातील महत्वाच्या कवींपैकी काही निवडक कवींच्या कवितेचा प्रवास,रसास्वाद कवींच्या उपस्थितीत दहा निवेदक सादर करणार आहेत. हा एक महत्वपूर्ण कविता आणि प्रेक्षक यांच्यात दुवा साधणारा प्रयोग ठरणार आहे. राजीव जोशी, आदित्य दवणे, गीतेश शिंदे, प्रथमेश पाठक, सतीश सोळंकुरकर, प्रतिभा सराफ, संजय चौधरी, छाया कोरेगावकर, सुजाता राऊत, मंदाकिनी पाटील, प्रिया धारूरकर ह्या कवींच्या कवितांचा रसास्वाद डॉ.क्षितिज कुलकर्णी, विदुला खेडकर, मुग्धा फाटक, हेमांगी कुळकर्णी संभूस, अपर्णा संत, नलिनी पुजारी, पुष्पांजली कर्वे, अस्मिता चौधरी, निलजा जायदे, अवधूत यरगोळे या दहा निवेदकांकडून सादर होणार आहे आणि या सर्व निवेदकांशी समन्वय साधणार आहेत निवेदिका साधना पाटील.
१ मे ते ३१ मे या कालावधीत अजेय संस्थेच्या शतकोटी रसिक समूहावर या पुरस्कारासाठी कविता करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळून पहिली निवड प्रक्रिया पार पडली. पहिल्या निवड प्रक्रियेचे परीक्षक कै. म.पा भावे यांचे सुपुत्र कवी विकास भावे होते.
अंतिम फेरीसाठी पुढील १० कवींची निवड करण्यात आली आहे.
मंजिरी पाटील, किरण बरडे, मधुरा कर्वे, नीलिमा टिल्लू, पुष्पांजली कर्वे, शुभा खांबेकर पाणसरे, सुमन आव्हाड, रवींद्र शेणोलीकर, राधा गर्दे, वर्षा जोशी
विशेष काव्य – शुभदा पाटकर, मीना घोडविंदे, अश्विनी चौधरी ‘विशेष काव्य’मध्ये निवड करण्यात येईल.
पुरस्काराच्या अंतिम फेरीचे परीक्षक श्री. कवी विकास भावे आणि कवी श्री. रामदास खरे असणार आहेत. सुप्रसिद्ध लेखिका ‘आम्ही सिद्ध लेखिका‘ च्या अध्यक्षा ‘मा.प्रा. पद्मा हुशिंग‘ या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘काव्ययोग’ मध्ये निवडलेल्या दहा कवींचा कविता रसिक प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. तसेच झपूर्झा मधील नवे कलाकार विशेष सादरीकरण प्रस्तुत करणार आहेत. तसेच, झपूर्झाची झलक पाहायला मिळणार आहे. झपूर्झा दशक महोत्सव चा पहिला दिवस ‘काव्ययोग’ कार्यक्रमाचे सर्व रसिक प्रेक्षकांना आग्रहाचे निमंत्रण..
विशेष सूचना — हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे.
1 Comment
Pingback: काव्ययोग संपन्न! — झपुर्झाचा पहिला टप्पा • रंगभूमी.com