भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य तसेच पारंपारिक व समकालीन नाटक महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून तसेच सर्वदूर पोहोचवण्याच्या हेतूने ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रम अर्थात रेपर्टरी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत ‘अपवाद आणि नियम’ आणि ‘वाघाची गोष्ट’ या दोन नाटकानंतर आता ललित कला केंद्र गुरुकुल विभागातर्फे आपल्यासाठी घेऊन येत आहे एक नाटक ‘संगीत: कमली की सत्वपरीक्षा अर्थात ह्यो रिश्ता क्या कहलाता है…?’
साधारणपणे लोककला प्रकाराच्या अंगाने उभ्या केलेल्या या नाट्यात नौटंकी आणि दशावताराचा मिलाफ आहे. विवाहसंस्थेला धरून पुर्वापार चालत आलेले सामाजिक संकेत आणि सर्वमान्य चौकटी माणूस जनरीत म्हणून स्वीकारतो. तथाकथित सुसंस्कृत बनून राहण्यासाठी नातं टिकवून ठेवण्याच्या हट्टात स्वतःशीच चाललेल्या झगड्याला आणि त्यातून होणाऱ्या दमनाला हे नाट्य अधोरेखित करतं. प्रेक्षकाला प्रश्न विचारू पाहतं. हे नाटक एका लोककथेवरून प्रेरित असून त्याचे लेखन शंतनू अडसूळ व दिग्दर्शन महेश खंदारे यांनी केले आहे.
नाटकाची संपूर्ण टीम (Cast & Crew)
लेखक – शंतनू अडसूळ
दिग्दर्शक – महेश खंदारे
कलाकार – ऋचिका खोत, शुभम साठे, सुशांत कुंभार, विक्रांत धिवरे, भाग्यश्री पवार, श्रेयसी दुसे
संगीत – जान्हवी मराठे, अवंती लाटणकर, ज्ञानदीप कासले, समीरण बर्डे
प्रकाशयोजना – तेजस कुलकर्णी
वेशभूषा – ऋचिका खोत, शंतनू अडसूळ
रंगभूषा – भाग्यश्री पवार
या वेगळ्या धाटणीच्या नाटकाला भरपूर प्रेक्षक पसंती मिळेल याबद्दल शंकाच नाही.