काव्यप्रेमींसाठी आजपासून तीन दिवस संध्याकाळी ४ वाजता “भावांतरण” हा एक सुंदर सोहळा Rimzimgunjan_art या इंस्टाग्राम अकाउंट वर आयोजिण्यात आला आहे. पावसाच्या सरी कोसळत असताना वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन घर बसल्या या कार्यक्रमाचा आनंद घेणं म्हणजे काव्य रसिकांसाठी मेजवानीच ठरणार आहे.
३, ४, ५ जुलै, २०२० रोजी पार पडणारा हा सोहळा तुम्ही इंस्टाग्राम वर Live पाहू शकता ठीक ४ वाजता. पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून हा कार्यक्रम नक्की पहा आणि अभिप्राय कळवा.
https://www.instagram.com/Rimzimgunjan_art/
तीन दिवसांच्या सोहळ्यासाठी आपल्याला सादरकर्ते म्हणून डॉ. नितीन अभ्यंकर, डॉ. मुकुल आचार्य आणि डॉ. अस्मिता दीक्षित हे मान्यवर लाभणार आहेत. तसेच मुलाखतकार असणार आहेत सौ. विजया पाटील. “भावांतरण” हा शब्द कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असेल. हे भावांतरण म्हणजे अनुवाद नाही. परंतु मूळ गझलचा भाव टिपण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न नक्कीच आहे! उदा. ‘श्रावणात घननीळा बरसला’ या मराठी गीताचे हिंदीतील भावांतरण ‘सावन के बादल यूं छाये।’, या चिरतरुण गाण्याची गोडी अमराठी रसिकांपर्यंत पोहोचविणे हा निखळ हेतू या भावांतरणामागचा. तर मग सज्ज व्हा भावांतरणाचा हा एक आगळा-वेगळा प्रयोग कवितांमधून अनुभवण्यासाठी!