कलेचा आधारस्तंभ म्हणजे रंगमंच. सूचक प्रकाशयोजनेत डोळ्यासमोर घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडतात. पण नाटक ही अशी कला आहे जी पाहताना जेवढी गुंतवून ठेवते तेवढीच ऐकताना विलीन करून घेते. ‘एका अंध प्रेक्षकालासुद्धा नाटकाचा आस्वाद घेता आला पाहिजे’, असं म्हणतात. नाटकाच्या सादरीकरणासह महत्वाची असते संहिता. संहितेत प्रत्येक पात्र वेगळे असते आणि प्रत्येक पात्राची गोष्ट असते. संहिता किंवा गोष्ट ऐकताना आपल्यासमोर उभे राहणारे दृश्य हे आपण केलेले दिग्दर्शन असते. आपण आपल्या रोजच्या जीवनाशी कथेचा संबंध जोडण्यास सुरुवात करतो. अशीच उत्तम संहिता नाटकाची शक्ती असते. संहितेचे वाचन जेवढे रम्यक तेवढेच आपण कथेत हरवले जातो. कथा वाचनाला कलेचा दर्जा लाभल्यामुळे दरवर्षप्रमाणेच या वर्षी iapar पुणे मार्फत नाट्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अँड रिसर्च म्हणजे iapar हे कलाकार आणि कला व्यावसायिकांचे नेटवर्क आहे जे कल्पनांची देवाणघेवाण करू इच्छितात. iapar ची स्थापना २०१३ साली झाली. तेव्हापासून त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय उपक्रम राबविले. iapar भारतीय आंतरराष्ट्रीय थिएटर संस्थेचे केंद्र (ITI-UNESCO) म्हणून काम करते. iapar दरवर्षी इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवलचे आयोजन करते. या इंटरनॅशनल थिएटर फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्याला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या निवडक कलाकृती दाखवल्या जातात. नाटकांवर लक्ष केंद्रित केले जाते. तसेच, जगभरात पोहोचून नाविन्यपूर्ण काम पुणे शहरात पोहोचवण्याची कल्पना आहे. हा महोत्सव कोणत्याही प्रकारच्या नाट्यमय सादरीकरणाला प्रोत्साहन देतो, जसे की दोन ते तीन अंकी नाटक, लघुनाट्य, कविता सादरीकरण, कथा नाट्यीकरण, एकपात्री आणि कोणत्याही नवीन सर्जनशील नवकल्पना.
सालाबादाप्रमाणे या वर्षी iapar इंटरनॅशनल थिएटर महोत्सव अंतर्गत कै. कुमार जोशी स्मृतीप्रीत्यर्थ नाट्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हे या स्पर्धेचे ६ वे वर्ष आहे.
या स्पर्धेला प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ आहे. तर स्पर्धा २० ते २९ ऑगस्ट दरम्यान होण्याची शक्यता आहे.
स्पर्धेच्या नियमानुसार नाट्य वाचनाचा कालावधी किमान १ तास ते कमाल २ तास असेल.
या स्पर्धेत कमीत कमी २ तर जास्तीत जास्त ७ स्पर्धक सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही [email protected] वर किंवा ९९२१६७६५३०/७७७५०५२७१९ या क्रमांकावर संपर्क करू शकता.
“नाट्यवाचनाकडे कलेच्या दृष्टीने कमी लक्ष दिले जाते. म्हणून या स्पर्धेमार्फत ‘कलाकारांनी वाचिक अभिनयासाठी आपला कस लावणे’ हे स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. या स्पर्धेत किमान २५ गट सहभागी होऊन उत्तम प्रतिसाद देतात. व्यावसायिक नाटकं, जुनी नाटकं अशा वेगवेगळ्या शैलीच्या मराठी नाटकांचे वाचन होते. नाट्यवाचन स्पर्धेत प्रकाशयोजना व नेपथ्याचा वापर करता येत नाही, वाचनावर जास्त भर दिला जातो.” – विद्यानिधी वनारसे (प्रसाद), संस्थापक
सर्व स्पर्धकांना आणि iapar टीमला www.rangabhoomi.com कडून शुभेच्छा!
2 Comments
Besttt💖🔥
Changli concept ahe