जागतिक रंगभूमी दिनाचे निमित्त साधून रंगभूमी आणि सिनेसृष्टीमध्ये मोलाची कामगिरी बजावलेल्या आणि आता टी.व्ही. वरील “अग्गबाई सासूबाई” या मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या डॉ. गिरीश ओक यांनी रसिक प्रेक्षकांना लाख मोलाचा एक संदेश दिला आहे. तसेच, Quarantine च्या या कठीण काळामध्येही रंगभूमी दिन कसा साजरा करता येईल याचा उपायही दिला आहे.
डॉ. गिरीश ओक यांनी आजवर दीपस्तंभ, यू-टर्न, कुसुम मनोहर लेले, कहानी में ट्विस्ट, श्री तशी सौ, तो मी नव्हेच अशा एक ना अनेक नाटकांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आजही, जेव्हा संपूर्ण जगाला कोरोना विषाणूने हादरवून सोडलंय तेव्हा ते social media द्वारे रसिक प्रेक्षकांना Online उपलब्ध असलेली नाटकं बघून आपण हा परीक्षेचा काळ अगदी सहज पार पाडू शकतो असे सांगितले आहे. रसिक प्रेक्षकांना या बिकट परिस्थितीमध्येही रंगभूमीशी जोडून ठेवण्याचा त्यांचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी पुढे त्यांना आवडणाऱ्या काही नाटकांची यादीही नमूद केली आहे.
डॉक्टर असंही म्हणतात की जर आपण हे जग एक रंगमंच आहे असे समजत असू आणि स्वत:ला त्यामधील पात्र समजत असू तर या नाटकामध्ये कोरोनारूपी खलनायकाचा प्रवेष झाला आहे आणि लवकरच आपल्याला या खलनायकाला रंगभूमीवरून आणि आपल्या आयुष्यातून बाहेर फेकून द्यायचं आहे. त्यासाठी, २१ दिवस घरात बसून कुटुंबियांसोबत रहावे आणि सगळ्या नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
डॉक्टरांची ही विचारसरणी आणि त्यांना रंगभूमीबद्दल वाटणारे प्रेम हे कौतुकास्पदच आहे आणि त्याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. आपण त्यांच्या या संदेशाची नक्कीच अंमलबजावणी करू अशी आम्हाला आशा आहे.
त्याचप्रमाणे, डॉक्टरांनी सुचवलेल्या नाटकांव्यतिरिक्त इतर नाटकेही तुम्हाला पाहायची असल्यास पुढील link चा वापर तुम्ही करू शकता.
१० सदाबहार मराठी नाटकांचा खजिना… खास तुमच्यासाठी!
अंतर्मुख व्हायला लावणारी ७ महिलाभिमुख नाटकं
६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला!
दिलीप प्रभावळकरांची ३ बहुरंगी नाटकं खास तुमच्या भेटीला!
[photo via Facebook]
1 Comment
Pingback: डॉ. गिरीश ओक आणि आसक्त कलामंच यांनी अवलंबिला YouTube या Online रंगमंचाचा मार्ग • रंगभूमी.com